Heifer Donation Agrowon
काळजी पशुधनाची

Cattle Donation : आदिवासी लाभार्थ्यांना मोफत कालवडी वाटप

Nashik Panjarpol : गेल्या १४६ वर्षांपासून आपला सेवाभाव अविरत जोपासत नाशिक शहरातील निमाणी बसस्थानकासमोरील साडेतीन एकर जागेत श्री नाशिक पंचवटी पांजरपोळ ही गोशाळा चालवली जाते.

Team Agrowon

Nashik News : गेल्या १४६ वर्षांपासून आपला सेवाभाव अविरत जोपासत नाशिक शहरातील निमाणी बसस्थानकासमोरील साडेतीन एकर जागेत श्री नाशिक पंचवटी पांजरपोळ ही गोशाळा चालवली जाते.

या संस्थेचा विस्तार करण्यासाठी अनेक विश्वस्तांनी आपली योगदान दिले आहेत. त्यापैकीच असलेले संस्थेचे दिवंगत विश्वस्त रामजी जव्हेरी (गोरखभाई) यांच्या जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्ताने जिल्ह्यातील सुरगाणा येथील आदिवासी बांधवांना २९ कालवडी मोफत वाटप करण्यात आल्या.

श्री नाशिक पंचवटी पांजरापोळ ही संस्था १४६ वर्षे जुनी धर्मदाय संस्था असून गौरक्षण व संवर्धन हा मुख्य उद्देश आहे. विद्यमान विश्वस्त गोपालभाई हर्षा जव्हेरी यांच्या मार्फत हा वारसा अविरतपणे चालूच आहे.

त्यांच्या विशेष प्रयत्नातून संस्थेची वाटचाल सुरू असून गोसंवर्धन, वृक्षारोपण, पर्यावरण व जैवविविधता संवर्धन यांसारखे उपक्रम राबवले जातात. याच अनुषंगाने सामाजिक कार्याचा एक भाग म्हणून गरजू गरीब आदिवासी बांधवांना मोफत गाई तसेच कालवडी वाटप केले जाते.

या कार्यक्रमप्रसंगी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. प्रशांत धर्माधिकारी, डॉ. सौ. धर्माधिकारी, पशुधन विकास अधिकारी डॉ. पाडवी, भास्कर गावित उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला गोमातेचे पूजन करून पूजन करण्यात आले. यावेळी दिवंगत विश्वस्त रामजी जव्हेरी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यानंतर अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे तांत्रिक सल्लागार डॉ. प्रकाश झांबरे यांनी केले. यावेळी त्यांनी उपस्थित लाभार्थ्यांना गो संगोपनाचे महत्त्व पटवून दिले. डॉ. धर्माधिकारी यावेळी म्हणाले, की संस्थेने उत्तम वळुच्या कालवडी संगोपणासाठी दिल्या आहे.

त्याची काळजी घेऊन कुटुंबाला त्याचा फायदा करून घेतला पाहिजे. संस्थेने सामाजिक जाणिवेतून यापूर्वी ९५ गाई व कालवडी वितरित केल्या आहेत. यावेळी संस्थेतील क्षेत्र व्यवस्थापक विठ्ठल आगळे, डॉ. नीलेश शेलार, अमोल भुसारे, किरण मुंजाळ, राजेंद्र लोखंडे, विजय सहारे, प्रमोद भोंडवे आदी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Incentive Subsidy Scheme : पात्र शेतकऱ्याला प्रोत्साहन अनुदानापासून वंचित ठेवले

Kukadi Water Storage: ‘कुकडी’त ६८ टक्के पाणीसाठा

Agrowon Podcast: मक्याचा बाजार स्थिर; कापूस दर स्थिर, टोमॅटोमध्ये काहीसे चढ उतार, तर डाळिंब व केळीला चांगली मागणी कायम

Mhaisal Lift Irrigation : ‘म्हैसाळ’साठी सौरऊर्जा प्रकल्पाचा नव्या वर्षात प्रारंभ

Wildlife Crop Damage : शाहूवाडीत वन्यप्राण्यांचा धुमाकूळ, शेतीचे नुकसान

SCROLL FOR NEXT