Jalgaon News : खानदेशात जिल्ह्यात गोवर्गीय जनावरांमधील संसर्गजन्य लम्पी स्कीन या चर्मरोगाच्या प्रतिबंधासाठी प्रशासन कमी पडत आहे. ‘लम्पी’ने एकूण ११० गावे बाधित झाली असून, पाच हजारांवर जनावरांना या आजाराची लागण झाली आहे. हा आजार पशुधनात पसरतच आहे.
लसीकरण संथ सुरू आहे. काही भागांत लसीकरण पूर्ण झाले आहे. यातच खासगी पशुवैद्यकीय पशुधनपालकांची वित्तीय लूट करीत आहे. कारण खासगी पशुवैद्यक उपचार करीत असून, त्यावर कुठलेही नियंत्रण नाही. शेतकरी, पशुपालक आपले पशुधन वाचविण्याची धपडत करीत आहेत. कारण पुरेसे संख्याबळ शासनाच्या पशुवैद्यकीय दवाखान्यांत नाही.
मोफत औषधे मिळेनात, सूचनांचा भडिमार
बाधित जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासह चराईसाठी पशुपालकांनी स्वतंत्र व्यवस्था करावी. गायी व म्हशींना स्वतंत्र ठेवणे, बाधित व बाधित नसलेली जनावरे वेगळी बांधणे तसेच या रोगाने ग्रस्त जनावरांचा मृत्यू झाल्यास मृतदेहांची शास्त्रीय पद्धतीने पशुपालकांनी विल्हेवाट लावावी.
बाधित परिसरात स्वच्छता व निर्जंतुक द्रावणाची फवारणी करून निर्जंतुकीकरण करावे व रोग प्रसारास कारणीभूत असलेल्या डास, माश्या, गोचिड आदींच्या नियंत्रणासाठी औषधांची फवारणी करावी. अश्या सुचना पशुसंवर्धन विभागाकडून देण्यात आल्या आहेत.
अनेक गावांत समस्या
रोगाचा फैलाव लक्षात घेऊन पशुधनाचे बाजार बंद करण्यात आले आहेत. परंतु धुळे, जळगाव, नंदुरबारात अनेक गावांत जनावरे किंवा पशुधन लम्पीच्या संक्रमणाने ग्रासले आहे. लम्पी चर्मरोग लसीकरणानंतर बरा होतो. त्यामुळे शेतकरी, पशुपालकांनी जनावरांचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
जनावरांची उत्पादन व प्रजनन क्षमता कमी होणार असल्याने दुग्ध व्यवसायाची मोठी हानी होत आहे. त्यामुळे बाधित व बाधित नसलेल्या जनावरांना लसीकरण करण्याची नितांत गरज आहे. पण लसीकरण संथ सुरू आहे. उपलब्ध एकूण लशींपैकी सरासरी ९० टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे, असा दावा पशुसंवर्धन विभाग करीत आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.