काळजी पशुधनाची

मुक्त व्यवस्थापनात शेळीपालन करावे का?

शेळीपालन व्यवसाय प्रामुख्याने तीन पद्धतीने केला जातो. यात मिश्र, मुक्त आणि बंदिस्त असे तीन प्रकार येतात.

Roshani Gole

मुक्त व्यवस्थापनामध्ये (extensive rearing) इतर पाळीव प्राण्यांच्या कळपाबरोबर शेळ्यांना (goat) चरायला सोडले जाते. चरायला सोडताना पडीक, नापीक जमिनीवर, उगवलेल्या गवतावर, झाडापाल्यावर झाडांच्या सालीवर, धान्य पिकांच्या अवशेषांवर स्वतः पालन पोषण करत असतात. मुक्त व्यवस्थापनामध्ये शेळ्यांच्या आहाराचे, पाण्याचे वेगळे व्यवस्थापन केले जात नाही. आहारासाठी शेळ्या पूर्णपणे निसर्गावर अवलंबून असतात. या पद्धतीमध्ये रात्रीच्या वेळी शेळ्यांच्या निवाऱ्याची सोय केली जाते.

मुक्त व्यवस्थापन पद्धतीचा वापर ज्या भागात पाऊस, कमी पडतो, उष्ण, डोंगराळ भागात केला जातो. या पद्धतीमध्ये निसर्गातील उपलब्ध साधन सामग्रीचा वापर पूर्णपणे करून घेतला जातो. अल्प भूधारक शेतकरी, शेतमजूर या पद्धतीचा अवलंब करताना दिसतात. फार पूर्वीपासून व्यवसाय करणारे पारंपारिक पशुपालक उत्पन्नाचा चांगला स्रोत म्हणून शेळीपालन पूर्वीपासून या पद्धतीने करीत आहेत.
या पद्धतीमध्ये शेळ्यांची संख्या जास्त असते. शेळ्यांची संख्या पन्नासच्या पुढे असू शकते. कमी गुंतवणुकीमध्ये, कमी मजूर संख्या तसेच चारा, पाणी यांवरील खर्चाचे प्रमाणही अत्यल्प असते.

मात्र व्यापारी तत्वांवर शेळी पालनाचा व्यवसाय करण्यासाठी मुक्त संचार पद्धतीची शिफारस केली जात नाही. कारण या पद्धतीमध्ये शेळ्यांच्या चरण्यावर बंधन राहत नाही. तसेच लेंडीखतही वाया जाते. शेळ्यांचे प्रजनन, आहार व्यवस्थापनावर योग्यरित्या लक्ष ठेवता येत नाही. शेळ्यांची दूध उत्पादन क्षमता लक्षात येत नाही. करडांना योग्य आहार न मिळण्यास त्यांची वाढ खुंटून मृत्युचे प्रमाण वाढते. व्यावसायिकदृष्ट्या शेळीपालनाचा व्यवसाय यशस्वी करायचा असेल तर मुक्त संचार पद्धत प्रभावी ठरत नाही. त्यासाठी शेळीपालकांनी बंदिस्त किंवा मिश्र पद्धतीचा अवलंब करावा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Village Story: आठवणींची फुलवात...

El Nino Impact on Monsoon: एप्रिल महिन्यात पाऊस दणका देणार का?

Water Conservation: जल-सृष्टी व्यवस्थेचे जनकेंद्री पुनरुज्जीवन

Grain Storage Pest Management: धान्य साठवणुकीतील ‘लेसर ग्रेन बोरर’

Rural Education Programme: जैवविविधता, शिक्षणाशी जोडणारी मायेसा फाउंडेशन

SCROLL FOR NEXT