Goat Farming Agrowon
काळजी पशुधनाची

Goat Farming : गाभण शेळ्यांचे व्यवस्थापन

पावसाळ्यात शेळ्यांचे गाभण राहण्याचे तसेच विण्याचे प्रमाण इतर ऋतूपेक्षा जास्त असते. वातावरणातील बदलामुळे गाभण शेळ्यांचे आजारी पडण्याचे प्रमाण वाढते. हे लक्षात घेऊन काळजी घेणे आवश्यक आहे.

टीम ॲग्रोवन

पावसाळ्याच्या काळात शेळ्यांच्या गोठ्यातील (Goat Shed) छताची गळती त्वरित बंद करावी. गोठ्यात पावसाचे पाणी असल्यास शेळ्यांमध्ये आजारांचे (Goat Disease) प्रमाण वाढते. दुर्गंधीयुक्त वातावरणाचे प्रमाण वाढून डोळे, खूर व श्‍वास-नलिकेचे आजार होण्याची शक्यता असते. वातावरणातील वाढलेल्या आर्द्रतेमुळे जंतुसंसर्ग (Bacterial Infection Due To Humidity) आजार होण्याचे प्रमाण देखील वाढते. रात्रीच्या वातावरणातील तापमान कमी होऊन शेळ्यांना थंडी लागण्याची शक्यता असते, त्यामुळे गोठा रात्री बंदिस्त ठेवावा. गोठ्यातील अस्वच्छतेमुळे गाभण शेळ्यांमध्ये (Pregnant Goat ) कासेचे आजार होण्याचे प्रमाण अधिक असते. म्हणून गोठा हा नेहमी स्वच्छ व कोरडा ठेवावा.

आहार आणि पाणी नियोजन :

१) गवतावर दव असताना शेळ्यांना परिसरात सकाळी बाहेरील वातावरणात चरण्यासाठी सोडू नये.

२) ओल्या चाऱ्याची साठवणूक केल्यास त्याला बुरशी लागण्याची शक्यता असते. असा चारा खाल्ल्याने शेळ्यांमध्ये पोटाचे विकार, गर्भपात होण्याची शक्यता असते. त्यामुळे ओल्या चाऱ्याची साठवणूक करू नये.

३) ओल्या चाऱ्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. परिणामी, त्यांना लागणारे आवश्यक घटक मिळत नाहीत. म्हणून आहारात ओल्या चाऱ्यासोबातच सुक्या चाऱ्याचा समावेश करावा.

४) बंदिस्त शेळीपालनामध्ये चारा हा उंचावर टांगून ठेवावा, जेणेकरून तो तुडवला जाणार नाही. खराब होणार नाही.

५) गाभण शेळ्यांना २४ तास स्वच्छ पाणी उपलब्ध करून द्यावे.

संभाव्य आजारावर प्राथमिक उपाय :

१) पावसाळा सुरू होण्यापूर्वी गाभण शेळ्यांना जंतुनाशक द्यावे.

२) सर्दी, बुळकांडी, हगवण इ. सारख्या आजारापासून शेळ्यांचा वेळीच बचाव करावा.

३) गोठ्या शेजारी साठलेल्या पाण्यामुळे माश्या, डास, गोचीड यांचे प्रमाण वाढते. हे सर्व घटक आजार पसरविण्यासाठी कारणीभूत असतात. म्हणून पाण्याचा साठा गोठ्यामध्ये होऊ देऊ नये.

४) पावसाळ्यामध्ये जखमांवर माश्‍या बसून त्या चिघळणार नाहीत याची काळजी घ्यावी. माशांवर नियंत्रण आणावे. कडुनिंब, निरगुडी, करंज पाला किंवा औषधाचा वापर करून गोठ्याचे निर्जंतुकीकरण करावे.

५) आजाराचे प्राथमिक लक्षण दिसताच पशुवैद्यकाच्या सल्ल्याने योग्य उपचार करावेत.

गाभण शेळ्यांची निगा :

१) शेळ्या विण्याच्या एक महिना आधी आणि विल्यानंतर एक महिना खुराक द्यावा.

२) गाभण शेळ्यांचा आहार संतुलित असावा. त्यामध्ये प्रथिने, खनिजे, जीवनसत्त्व, पाण्याचे योग्य प्रमाण असावे.

३) गाभण शेळ्यांना दररोज अडीचशे ते तीनशे ग्रॅम जास्त खुराक द्यावा. आवश्यक हिरवा चारा आणि वाळलेला चारा द्यावा.

४) शेळी विण्याच्या एक आठवडा आधी हिरव्या वैरणीचे प्रमाण कमी करून त्याऐवजी सकस वैरण द्यावी.

५) गाभण काळातील शेवटच्या आठवड्यात शेळ्यांना चरण्यासाठी बाहेर सोडू नये. गाभण शेळ्यांना कळपात न ठेवता इतरांपेक्षा वेगळे ठेवावे. शेवटच्या आठ दिवसांत खुराक शंभर ग्रॅमने कमी करावा.

६) विण्याची तारीख नोंद करून ठेवावी. त्यावर लक्ष ठेवावे. शेळी विण्याच्या वेळी आडल्यास त्वरित पशुवैद्यकास संपर्क करावा.

संपर्क ः डॉ.अनुजकुमार कोळी,९१४५०५०२३७

(पशुप्रजननशास्त्र विभाग, पशुवैद्यकीय महाविद्यालय, उदगीर जि. लातूर)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kalamna APMC : कळमना ‘एपीएमसी’ची एसआयटी चौकशी अवैध

Jalgaon Flood: जळगावमधील पाचोऱ्यात पावसामुळे पूरस्थिती; गिरीश महाजनांचे प्रशासनाला मदतीचे निर्देश

Maharashtra Heavy Rain : राज्यातील १३ जिल्ह्यांतील १६६ मंडळात अतिवृष्टी

E-Peek Pahani : खरिपातील ४ लाख ९२ हजार हेक्टर क्षेत्रावरील ई पीक पाहणी

Rain Crop Damage : अतिवृष्टीचा ९० हजार ४८३ हेक्टरवरील पिकांना फटका

SCROLL FOR NEXT