milking animals Agrowon
काळजी पशुधनाची

Animal Milk Management : दुभत्या जनावरांचे व्यवस्थापन

Animal Management : दुभत्या जनावरांच्या व्यवस्थापनाचा परिणाम दुधातील फॅट आणि डिग्रीच्या प्रमाणावर होतो. दोन वेळा धार काढण्यामधील कालावधी वाढल्यास दूध जास्त मिळते, परंतु फॅटचे प्रमाण कमी होते.

Team Agrowon

डॉ. एस. ए. ढेंगे

Milk Rate : दुभत्या जनावरांच्या व्यवस्थापनाचा परिणाम दुधातील फॅट आणि डिग्रीच्या प्रमाणावर होतो. दोन वेळा धार काढण्यामधील कालावधी वाढल्यास दूध जास्त मिळते, परंतु फॅटचे प्रमाण कमी होते.

कालावधी कमी झाल्यास दूध उत्पादन कमी होऊन फॅटचे प्रमाण वाढते. यासाठी दूध काढण्याच्या वेळात समान अंतर ठेवावे.

कासेतील दूध संपूर्ण काढल्यास फॅट जास्त निघते, अपूर्ण काढल्यास फॅट कमी लागते. वेतामध्ये दूध वाढते तसतसे फॅट कमी होते आणि जसजसे दुधाचे उत्पादन कमी होते तसे फॅटचे प्रमाण वाढते.

विण्याच्या वेळी जनावराची तब्येत उत्तम असल्यास भरपूर दूध व जास्त फॅट मिळते. दूध काढतेवेळी कोणत्याही कारणाने जनावर घाबरल्यास दूध उत्पादन आणि फॅटचे प्रमाण घटते.

पावसाळा आणि हिवाळ्यात दूध उत्पादन जास्त, फॅटचे प्रमाण कमी आणि उन्हाळ्यात दूध उत्पादन कमी होऊन फॅटचे प्रमाण जास्त मिळते.

उष्ण तापमानाचा परिणाम

संकरित गायींना २० ते २७ अंश सेल्सिअस तापमान अनुकूल असते, परंतु जेव्हा तापमान २७ अंश सेल्सिअसच्या वर जाऊ लागते तेव्हा दुधातील फॅट कमी होऊ शकते. हे प्रमाण १५ ते २० टक्क्यांपर्यंत असू शकते.

साधारणतः २७ अंश सेल्सिअसवर दर ५ अंश सेल्सिअस वाढीने ०.२ टक्का फॅट कमी होऊ शकते, म्हणून गोठ्यातील तापमान अनुकूल ठेवण्याची सोय करावी. यासाठी गोठ्यात पडदे लावून पाणी मारावे.

गोठ्याच्या पत्र्यावर कडबा ठेवून पत्रे उष्ण होणार नाहीत याची काळजी घ्यावी.

वेतातील दिवस

- गाय किंवा म्हैस व्याल्यानंतर पहिले दहा दिवस दुधातील फॅट चांगले असते. जसजसे दूध वाढत जाते तसे फॅट अल्प प्रमाणात कमी होत जाते.

- व्यायल्यानंतर दोन ते चार महिन्यांपर्यंत दुग्धोत्पादन थोडे थोडे वाढू लागते. त्यानंतर वाढून स्थिर राहते.

- ज्या वेळी जनावर आटण्यास येते त्याचा अगोदर काही आठवडे दूध उत्पादन कमी झाले असते तर त्यातील फॅटचे प्रमाण वाढलेले असते.

- गाई-म्हशींच्या सहा वेतांनंतर फॅट आणि डिग्री घटकांचे प्रमाण कमी होते. वृद्ध दुधाळ जनावरांच्या दुधातील फॅटचे प्रमाण बरेच कमी होते.

- विताना गाय म्हैस अशक्त असल्यास अशा जनावरांपासून येणाऱ्या दुधात फॅटचे प्रमाण कमी आढळते.

- गाई- म्हशींचे वेत जसे वाढत जाते, तसे दुधातील फॅटचे प्रमाण कमी होत जाते.

दूध वाहतूक

बहुतांश वेळा दूरवरच्या वाहतुकीत दूध हिंदकळले जाते. दुधातील फॅटचे कण किटलीच्या झाकणास चिटकून वाया जातात, त्यामुळे दुधातील फॅट कमी होते.

व्यवस्थापनातील त्रुटी

व्यवस्थापनातील काही त्रुटीमुळे देखील दुधातील फॅट कमी होते. उदा. काही वेळा दुधात कचरा असल्यास ते स्वच्छ करण्यासाठी दूध कापडाच्या साह्याने गाळण्यात येते; परंतु असे केल्याने दुधातील फॅट वाया जाते.

म्हणून दूध नेहमी कापडाऐवजी गाळणीच्या साह्याने गाळावे कारण गाळणीची छिद्रे कापडाच्या छिद्राच्या तुलनेत आकाराने मोठी असतात. त्यामुळे फॅटचे गोलकण गाळणीवर न राहता दुधासोबत जातात.

(पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Land Acquisition: विमानतळासाठी सात गावांमध्ये भूसंपादन क्षेत्र ४० टक्क्यांनी कपात

Pune Heavy Rain: मुसळधार पावसामुळे भातरोपे तरारली

Maharashtra Farmer Protest: शेतमजूर, शेतकरीप्रश्‍नी मुंबईत २८ ऑक्टोबरला धडक : कडू

Gorakshak Attacks: हल्ले बंद न झाल्यास पोलिस स्थानकांत छावण्या उभारू: आमदार सदाभाऊ खोत

Ganpati Festival 2025: सिंधुदुर्गात गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीची लगबग

SCROLL FOR NEXT