Lumpy Skin Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Skin : महाराष्ट्रात ‘लम्पी स्कीन’ आजार नियंत्रणात

राधाकृष्ण विखे-पाटील : शासन पशुपालकांच्या पाठीशी खंबीर

टीम ॲग्रोवन

नांदेड : संपूर्ण राज्यात ‘लम्पी स्कीन’ (Lumpy Skin) आजाराबाबत प्रशासनाला दक्षतेचा इशारा दिला आहे. आपण प्रत्यक्ष फिरून आढावाही घेत आहे. राज्यातील ३० जिल्ह्यांत या आजाराचा पशुधनात (Livestock) शिरकाव झाला आहे. अन्य राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात आपण वेळीच खबरदारी व उपाययोजना सुरू केल्याने ‘लम्पी स्कीन’ आजार नियंत्रणात आहे.

पशुपालक शेतकऱ्यांनी घाबरून न जाता शासनाने निर्देश दिल्याप्रमाणे काळजी घ्यावी, असे आवाहन राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले. नांदेड येथे रविवारी (ता. २५) शासकीय विश्रामगृहात आढावा बैठकीत ते बोलत होते

या वेळी खासदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार राम पाटील रातोळीकर, जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे, मनपा आयुक्त सुनील लहाने, पशुसंवर्धन विभागाचे सहायक आयुक्त डॉ. मधुसूदन रत्नपारखी, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. बी. यू. बोधनकर, डॉ. अरविंद गायकवाड आदी उपस्थित होते.

ज्या जनावरांना ‘लम्पी स्कीन’ आजार झाला आहे अशा जनावरांना बाजूला ठेवून त्यावर औषधोपचार तत्काळ सुरू केले पाहिजे. पशुसंवर्धन विभागाकडे मुबलक प्रमाणात औषधे व लसीची मात्रा उपलब्ध आहे. शेतकऱ्यांना, पशुपालकांना लम्पी आजार लसीकरण दृष्टिकोनातून काही कमी पडू दिले जाणार नाही अशी निसंदिग्ध ग्वाही मंत्री विखे-पाटील यांनी दिली. सध्या ज्या गावात ‘लम्पी स्कीन’ बाधित जनावरे आढळत आहेत त्या गावाच्या पाच किलोमीटर परिघापर्यंत असलेल्या गावात प्राधान्याने लसीकरण केले जात आहे.

असलेली मर्यादा वाढविण्यासाठी प्रयत्न करून इतर गावातही लसीकरण वाढविण्याचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. ‘लम्पी स्कीन’ आजारामुळे ज्या पशुपालकांनी आपली जनावरे गमावली आहेत त्यांच्यासाठी शासनातर्फे अर्थसाहाय्य केले जात आहे. यात दुभत्या गाईसाठी ३० हजार रुपये, शेतात काम करणाऱ्या बैलासाठी २५ हजार रुपये, लहान कालवडी असल्यास १६ हजार रुपये मदत दिली जात असल्याचे त्यांनी सांगितले. या व्यतिरिक्त जिल्हा परिषदेलाही सानुग्रह अनुदान देण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत, असे मंत्री विखे-पाटील यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

India Heavy Rain: राजस्थान, हिमाचलला जोरदार पावसाचा फटका

Agriculture Brand of Maharashtra: आनंदी गावे, समाधानी शेतकरी निर्माण करू

Onion Scam: ‘नाफेड’, ‘एनसीसीएफ’कडून चौकशी प्रक्रियेत सहकार्य न करता टाळाटाळ

Foreign Study Tour Cost: परदेश अभ्यास दौऱ्याचा खर्च वाढला, अनुदान ‘जैसे थे’

Maharashtra Weather: कोकण, घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT