‘Lumpy Skin Team agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy skin : लम्पी स्कीनमुळे शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड

जनावरांच्या उपचाराचा भार सोसेना; सरकारी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता

Team Agrowon

फुलंब्री, जि. औरंगाबाद : तालुक्यात महिनाभरापासून लम्पी स्कीन (Lumpy skin) आजाराने अनेक जनावरांना (Animal) ग्रासले आहे. परिणामी काही जनावरांचा यात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. लम्पी स्कीन आजारग्रस्त जनावरांवर उपचार करताना शेतकऱ्यांच्या (Farmer) नाकीनऊ येत असून लम्पी स्कीन  आजाराने ग्रस्त असलेल्या जनावरांचा भार शेतकऱ्यांना सोसवणे फार अवघड झाले आहे.

सरकारी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता भासत असल्याने खासगी डॉक्टरांकडून उपचार करावे लागत असल्याने शेतकऱ्यांवर मोठा आर्थिक  भुर्दंड पडत आहे. तालुक्यात शेतीबरोबरच दुग्धव्यवसायाचा जोडधंदा मोठ्या प्रमाणात शेतकरी करीत असतात.

तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्याकडे बैल जोडी व गाय अशी जनावरे आहे. परंतु ही जनावरे सांभाळत असताना ग्रामीण भागात लम्पी स्कीन  आजाराचा मोठा शिरकाव झालेला दिसून येत आहे. परिणामी अनेक जनावराचा या लम्पी स्कीन  आजारात दुर्दैवी मृत्यूही झालेला आहे.
फुलंब्री  तालुक्याला स्वतंत्र पशुवैद्यकीय डॉक्टर कमी असल्याने याचा फटका शेतकऱ्यांना बसू लागला आहे.

परिणामी खासगी पशुवैद्यकीय डॉक्टरांकडून शेतकऱ्यांना आपल्या जनावरांवर उपचार करून घ्यावा लागत आहे.  खासगी डॉक्टरांकडून उपचार करीत असताना विविध औषधी मोठ्या प्रमाणात लागत असल्याने याचा आर्थिक भुर्दंड शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. आधीच परतीच्या पावसाने शेतकरी हैराण झाला असताना त्याला जनावराचा उपचार करणे जिकरीचे होऊ लागले आहे. पावसाने मका पिके नष्ट झाल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. शासनाने शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेऊन गावागावातील जनावराचे सर्वेक्षण करून मोफत उपचार करावे, अशी मागणी आता शेतकऱ्यांतून होत आहे.


जनावरांचा बाजार भरविण्याची परवानगी द्या ः डॉ. गोपाळ वाघ
फुलंब्री तालुक्यात वडोद बाजार येथे जनावरांचा सर्वात मोठा बाजार भरतो. जनावरांच्या बाजारावर वडोद बाजार ग्रामपंचायतीचा विकास कामाचा गाडा चालतो. मराठवाड्यातील सर्वात मोठा जनावरांचा बाजार म्हणूनही वडोद बाजारची ओळख आहे.

परंतु लम्पी स्कीनमुळे जनावरांचा बाजारही बंद करण्यात आलेला आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतीचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. लम्पी स्कीनचे नियम पाळून हा बाजार पूर्ववत सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी उपसरपंच डॉ. गोपाल वाघ यांनी केली

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT