Livestock market Agrowon
काळजी पशुधनाची

Livestock Market : आळेफाटा येथील गायींचा बाजार उद्यापासून सुरू

जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा येथील उपबाजार समितीमध्ये दर गुरुवारी गायींच्या खरेदी-विक्रीचा मोठा बाजार भरत असतो.

टीम ॲग्रोवन

आळेफाटा, ता.जुन्नर ः पुणे, नगर, ठाणे या तीन जिल्ह्यांसाठीचा महत्त्वाचा असलेला आळेफाटा (ता. जुन्नर) येथील गायींचा बाजार (Cow Market) गेल्या चार महिन्यांपासून बंद होता. मात्र उद्यापासून (ता.२९) बाजार सुरू होणार असल्याची माहिती आळेफाटा उपबाजार समितीचे व्यवस्थापक प्रशांत महाबरे यांनी दिली.

जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा येथील उपबाजार समितीमध्ये दर गुरुवारी गायींच्या खरेदी-विक्रीचा मोठा बाजार भरत असतो. या ठिकाणी पुणे, अहमदनगर, नाशिक, ठाणे या जिल्ह्यांतून व्यापारी तसेच शेतकरी मोठ्या प्रमाणावर गाई खरेदी-विक्रीसाठी येत असतात.

मात्र लम्पी स्कीनच्या प्रादुर्भावामुळे हा बाजार गेल्या चार महिन्यांपासून बंद होता. यामुळे मोठी उलाढाल थांबली होती. आता लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव नियंत्रणात आला आहे, तसेच बहुतांश पशुधनांचे लसीकरण झाले असल्याने प्रशासनाने गायींच्या बाजारास सुरू करण्यासाठी मान्यता दिली आहे. यामुळे उद्यापासून (ता. २८) जनावरांचा बाजार नियमित सुरू होणार आहे, असे महाबरे यांना सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pune Fruit Market: उन्हाळी हंगामात फळे तेजीत

Education Reform: शिक्षणात सुधारणा ही सामूहिक जबाबदारी

Ethanol Fuel: इथेनॉल ठरेल पर्यायी इंधन

Namo Shetkari Mahasamman Yojana: ‘नमो’चा आठवा हप्ता पुढील आठवड्यात

Pune ZP: पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी वीरधवल जगदाळे

SCROLL FOR NEXT