Fodder Shortage  Agrowon
काळजी पशुधनाची

Fodder Shortage : चाऱ्याअभावी गोधन पाळण्याची कसरत

livestock Management : खरीप हंगामात चारावर्गीय पिकांचे लागवड क्षेत्र कमी झाल्याने दर वर्षी चाऱ्याची टंचाई निर्माण होत असते.

Team Agrowon

Akola News : खरीप हंगामात चारावर्गीय पिकांचे लागवड क्षेत्र कमी झाल्याने दर वर्षी चाऱ्याची टंचाई निर्माण होत असते. या वर्षी चाराटंचाईमध्ये अधिक वाढ झाली असून, या तालुक्यात चाराटंचाई सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पशुखाद्याचे वाढलेले दर व चाराटंचाईमुळे दुग्ध उत्पादक शेतकरी, गौरक्षण संस्था चालक अडचणीत सापडले आहेत. चारा छावण्या सुरू करण्याची मागणी केली जात आहे.

गौरक्षण कायदा लागू झाल्यापासून गोरक्षणामध्ये येणाऱ्या जनावरांची संख्या वाढली आहे. अनेकवेळा छुप्या मार्गाने कत्तलीसाठी जाणारे गोवंश पोलिस प्रशासनाच्या सतर्कतेमुळे जप्त करून देखभाल व संरक्षणासाठी गोरक्षण संस्थांमध्ये आणून सोडले जाते.

सध्या चारा टंचाईमुळे गोवंशावर उपासमारीची वेळ आली असून शासनाकडे चारा छावण्याची मागणी करूनही गेल्या दोन वर्षांपासून कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आली नसल्याचे वास्तव समोर आले आहे.

गेल्या दोन ते तीन वर्षांपासून बार्शीटाकळी तालुक्यात चाऱ्याची टंचाई निर्माण होत आहे. परिणामी अनेक पशुपालक आपल्या मालकीच्या गायी, म्हैशी, बैल आदी जनावरे विक्रीसाठी बाजारात नेताना दिसतात.

प्रशासनाने याचा गांभीर्याने विचार करून गोरक्षणामध्ये असणाऱ्या गोवंशांना चारा छावण्या उपलब्ध करून देण्याची मागणी बार्शीटाकळी तालुक्यातील गोरक्षण संस्था चालकांनी केली आहे.

मी अनेक वेळा शासनाकडे गोरक्षणमधील जनावरांसाठी चारा छावण्या उभारण्याची मागणी केली. चाराटंचाईमुळे जनावरांवर उपासमारीचे संकट येऊ नये, या हेतूने अकोला जिल्ह्यातील नोंदणीकृत गोरक्षण संस्थेमध्ये असणाऱ्या गोवंशासह इतर जनावरांकरिता चाऱ्याचे नियोजन करण्यासाठी पत्राद्वारे सुचविले. परंतु अद्यापही संबंधित यंत्रणेकडून काही झाल्याचे दिसत नाही.
- रामराव चव्हाण, गोरक्षण संस्था प्रमुख, काजळेश्वर, ता. बार्शीटाकळी, जि. अकोला
सध्या गोरक्षणमध्ये असणाऱ्या गोवंशाचे पालनपोषण करण्यासाठी संस्थाचालकांना फार मोठी कसरत करावी लागत असून भीषण चाराटंचाईमुळे उपासमारीची वेळ आली आहे. इतकेच नव्हे तर चाऱ्यासाठी गोरक्षणमधील गोवंशंना भटकावे लागत आहे. शासनाने चाराटंचाई दूर करण्यासाठी आपल्या स्तरावर योग्य ते नियोजन करून चारा उपलब्ध करून द्यावा
- सचिन गालट, प्रमुख, आदिशक्ती गोसंधान केंद्र धाबा (राजनखेड)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sericulture Farming: रेशीम शेती, चॉकी सेंटरद्वारे उत्पन्नासोबतच शेतकऱ्यांची सेवा

Inspiring Farmer Story: वाघदऱ्याच्या गुहेतील वाघ अन् वाघीण

India Alliance Protest: राहुल गांधीच्या नेतृत्वात इंडिया आघाडीचा दिल्लीत मोर्चा; पोलिसांकडून नेत्यांची धरपकड

Bamboo Cultivation : चंद्रपूर जिल्ह्यात पाच हजार हेक्टर क्षेत्रावर होणार बांबू लागवड

Humani Pest : दारव्हा तालुक्यात हुमणी अळीमुळे सोयाबीनचे नुकसान

SCROLL FOR NEXT