कुक्कुटपालनामध्ये (Poultry) अनेक मार्गांनी रोग प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. हे लक्षात घेता उपचारापेक्षा प्रतिबंधास अधिक महत्त्व आहे. कोंबड्यांच्या शेडमध्ये (Poultry Shed) विविध मार्गानी रोगांचा प्रसार होत असतो. कोणकोणत्या घटकांमार्फत कोंबड्यांमध्ये रोगाचा प्रसार होतो याविषय़ी पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर येथील डॉ. प्रफुल्लकुमार पाटील यांनी दिलेली माहिती पाहुया.
अंड्यांमार्फत प्रसार
रोग प्रसार एम्ब्रीओमार्फत पिलांमध्ये होतो. यामध्ये सालमोनेल्लोसीस, मायकोप्लाझमोसीस, इन्फेक्शियस ब्रॉंकायटीस, फाउल टायफॉइड, रानीखेत आजारांचा समावेश होतो. प्रसार टाळण्यासाठी हॅचरीजमध्ये योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.
हॅचरीजमधून प्रसार
अंडी व कोंबडी विष्ठा, मूत्र यांचा अंड्यांच्या कवचाबरोबर संपर्क येतो. यामुळे अशा अंड्यांना गादी साहित्य, श्वसननलिकेतील स्राव, उपकरणे इत्यादींमार्फत संसर्ग होऊन प्रसार होतो. यामध्ये स्ट्रेप्टोकोकोसीस, ई कोलाय इन्फेक्शन, प्रोटीओसीस, सालमोनेलोसीसचा प्रसार टाळण्यासाठी योग्य प्रकारची उपाययोजना हॅचरीज तयार करताना करावी.
हवेमार्फत रोगप्रसार
कोंबड्यांना श्वसनाचे आजार झाले असल्यास त्यांचे श्वसनमार्गातील कण, स्राव, जंतू हवेत सोडले जातात. मायकोप्लाझमोसीस, लॅरीन्जीओट्रकायटीस, रानीखेत आजार इत्यादी. हवेमार्फत रोगप्रसार टाळण्यासाठीही आजारी कोंबड्यांना वेगळे ठेवून व्यवस्थापन आणि उपचार करावेत. त्याचबरोबर आजारी कोंबड्यांचे व्यवस्थापन करणाऱ्या कामगाराला हातमोजे, बूट यांचा वापर करणे बंधनकारक करावे. शेडमध्ये हवा खेळती राहावी, आर्द्रता व वास वाढू देऊ नये.
माश्या, डासांद्वारे रोगप्रसार
डास, गोचीड, पिसवा, माश्या इत्यादींमार्फत रोगप्रसार होतो. सदर कीटक आजारी कोंबड्यांपासून जंतूंचा प्रसार निरोगी कोंबड्यांपर्यंत करण्याचे काम करतात. या कीटकांबरोबरच उंदीर, इतर पक्षीसुद्धा रोगप्रसाराचे काम करतात. रोगप्रसार टाळण्यासाठी डास, गोचीड, पिसवा, माश्या यांचा प्रतिबंध करावा. शेडच्या आजूबाजूला पाणी साठून दलदल होणार नाही, शेड कोरडे राहील याची काळजी घ्यावी. शेडमध्ये पक्षी, उंदीर येऊ नयेत म्हणून उपाययोजना करावी. यासाठी कीटकनाशक फवारणी, माश्यांसाठी ट्रॅप या बाबी उपयोगी पडतात. साहित्य, उपकरणाद्वारे रोगप्रसार खाद्य-पाण्याची भांडी, खाद्याची पोती, पायातील चपला/बूट, कपडे, अंड्याचे ट्रे, कोंबड्यांचे पिंजरे इत्यादींमार्फत रोगप्रसार होऊ शकतो.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.