Lumpy Skin
Lumpy Skin  Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Skin : यवतामाळ जिल्ह्यातील दहा तालुक्यांत प्रादुर्भाव

टीम ॲग्रोवन

यवतमाळ : जिल्ह्यासह सर्वत्र सध्या पशुधनावर लम्पी स्कीन (Lumpy Skin Disease) आजाराने आक्रमण केले असून, या आजाराच्या संक्रमणामुळे शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील दहा तालुके लम्पी स्कीन आजाराने बाधित झाले आहेत. संसर्ग कमी करण्यासाठी जास्तीत जास्त लसीकरण (Lumpy Vaccination) करण्यावर भर दिला जात आहे. लम्पी स्कीन आजारामुळे एकाही पशुधनाचा (Livestock) मृत्यू झालेला नाही.

लम्पी स्कीन आजारामुळे आतापर्यंत बाभूळगाव, झरी जामणी, घाटंजी, यवतमाळ, पुसद, महागाव, उमरखेड, पांढरकवडा, दारव्हा, मारेगाव हे दहा तालुके बाधित झाले आहेत. नायगाव, मुकुटबन, देमाडदेवी, मांगी, उमरसरा, बरबडा, देवगव्हाण, कासोला, अकोला बाजार, जवळा, लोणी, कोळंबी, कारेगाव, बेचखेडा, साखरा, राहूर, शिरोली, वाढोणा, वडवत, गणेशपूर, वेगाव, पाटण, पारडी, भारी, खानगाव, बोथबोडन, चांदपूर, तरोडा, नवरगाव, आमणी (ख), धानोरा, मारेगाव जळका, बोरीसिंह, तळेगाव, पाटपांगरा, करंजी, वाघरटाकळी, बिलायता या गावांतील पशुधन लम्पी स्कीनमुळे संक्रमित झाले आहेत.

आतापर्यंत ११६ पशुधन लम्पी स्कीनने बाधित झाली असून, ६१ बरे झाले आहेत. तर ५५ पशुधनांवर उपचार सुरू आहेत. संक्रमण टाळण्यासाठी लसीकरण करण्यावर भर देण्यात येत आहे. लम्पी स्कीन आजाराची इतर पशुधनाला बाधा होऊ नये,

यासाठी सर्वच पशुधनाला लसीकरण करण्यात येत आहे. टप्प्याटप्प्यात लसींच्या मात्राही उपलब्ध होत आहेत. आतापर्यंत एकाही पशुधनाचा मृत्यू झाला नाही. शेतकऱ्यांनी घाबरून न जाता लसीकरण करून घ्यावे.

- डॉ. क्रांती काटोले, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जि. प. यवतमाळ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pre Monsoon Precautions : मॉन्सूनपूर्व सर्व कामे यंत्रणांनी वेळेत पूर्ण करावीत

Agriculture Fertilizer : खतांचे दोन लाख २० हजार टन आवंटन जिल्ह्यासाठी मंजूर

Illegal Seeds : सीमावर्ती भागात बेकायदा बियाणे गुणनियंत्रणच्या रडारवर

Pre-Kharif Review Meeting : गावनिहाय पीक उत्पादन आराखडे वेळेत तयार करावेत

Agriculture Cultivation : रत्नागिरीत लागवडीखालील क्षेत्र ४ हजार हेक्टरने घटले

SCROLL FOR NEXT