Lumpy Skin Disease
Lumpy Skin Disease Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Skin Vaccine : ‘लम्पी स्कीन’वर हवी प्रभावी लस

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

नागपूर ः देशात ‘लम्पी स्कीन’ आजाराचा (Lumpy Skin Disease) प्रादुर्भाव वाढता असून एक लाखापेक्षा अधिक जनावरे यामुळे दगावली आहेत. महाराष्ट्रात सात हजारांवर जनावरांच्या मृत्यूची नोंद पशुसंवर्धन (Animal Husbandry Department)खात्याने २० आक्टोबर पर्यंत घेतली आहे. यंदा जनावरांना बाधा पोचविणारा म्युटंट हा अधिक घातक असून उत्परिवर्तन (म्युटेशन) झाल्याने जनावर दगावण्याचे प्रमाण वाढल्याची नोंद संशोधन संस्थांनी घेतली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर कोरोनाच्या धर्तीवर या आजाराच्या नियंत्रणासाठी वेळीच प्रभावी लसीची निर्मिती व्हावी, अशी मागणी होत आहे.

देशात गेल्या काही महिन्यांपासून गोवंशीय जनावरांमध्ये ‘लम्पी स्कीन’चा प्रादुर्भाव वाढला आहे. तब्बल १६ राज्यांतील जनावरांना यांचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यानुसार सद्यःस्थितीत देशभरात बाधित जनावरांची संख्या २१ लाख ९३ हजारांवर पोचली आहे. आकडेवारीनुसार बाधित जनावरांपैकी सुमारे १ लाख ११ हजार १०३ जनावरांचा मृत्यू झाला आहे. मृत जनावरांमध्ये सर्वाधिक संख्या ही ७२ हजार ६८८ राजस्थानमधील आहेत. त्या पाठोपाठ पंजाबमध्ये १७ हजार ९१०, हिमाचल ७ हजार ४३८, गुजरात ६ हजार १३० गोवंशीय जनावरे आहेत.

महाराष्ट्रातील बाधित जनावरांची संख्या १ लाख ३ हजार ३१३ इतकी असून ७७ हजार ११८ जनावरे उपचाराअंती बरी झाली असून तब्बल ७ हजार ३९४ जनावरांचा मृत्यू झाला आहे. २०२१ मध्ये ३८ हजार जनावरांना ‘लम्पी स्कीन’चा प्रादुर्भाव झाला होता. मात्र एकाही जनावरांचा मृत्यू झाला नव्हता. या वेळी मात्र आजाराची तीव्रता वाढल्याने जनावरे दगावण्याचे प्रमाण वाढले आहे.

या पार्श्‍वभूमीवर कोरोनाप्रमाणे जनावरांमधील या आजाराच्या नियंत्रणासाठी वेळीच प्रभावी लसीची निर्मिती व्हावी, अशी मागणी पशुवैद्यक क्षेत्रातील तज्ज्ञांकडून होत आहे. महाराष्ट्रात जनावरांमधील आजाराची लक्षणे पाहता उपचार पद्धतीची शिफारस महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाकडून केली जात आहे. मात्र सातत्याने पडणारा पाऊस या आजाराच्या नियंत्रणात मोठा अडसर ठरला आहे. पावसामुळे गोठ्याच्या परिसरात दलदल वाढल्याने डास आणि माशाही वाढतात. दुसरीकडे राजस्थानमध्ये बाधित आणि मृत जनावरांचे प्रमाण वाढले आहे. सध्या जनावरांना गोट पॉक्‍स लस दिली जात असली तरी येत्या काळात लम्पी स्कीनचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे.

लम्पी स्कीन आजारावर जगभरात सध्या गोट पॉक्स ही लस वापरली जाते. त्याचे परिणामही चांगले असून ७० टक्के रिझल्ट मिळतात. मात्र या आजाराच्या तातडीने नियंत्रणासाठी प्रभावी अशी लस असावी, अशी मागणी होती. त्यानुसार केंद्र सरकारच्या अखत्यारितील भारतीय पशू संशोधन संस्थेने ‘लम्पी स्कीन’ नियंत्रणासाठी लस विकसित केलेली आहे. केंद्र सरकारच्या काही कंपन्या, संस्थांच्या माध्यमातून ती पुढील वर्षी उपलब्ध होईल, अशी अपेक्षा आहे.

- डॉ. रामदास गाडे,

अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य राजपत्रित पशुवैद्यकीय संघटना

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Karnataka Drought farmers : कर्नाटकातील शेतकऱ्यांना लवकरच दिलासा; दोन-तीन दिवसांत मिळणार दुष्काळाचे पैसे 

Monsoon 2024 : सलग अकरा महीने उष्णतेची| तीन नवीन ट्रॅक्टर बाजारात दाखल| राज्यात काय घडलं?

Jambhul Season : जांभळाचा हंगाम लांबल्याने जांभूळ पिकाला फटका

Crop Loan : पीक वाटपात विदर्भ आणि मराठवाड्याशी दुजाभाव का?

Land Survey : कोल्हापुरातील सहा तालुक्यांत जमिनींची ‘ई-मोजणी’ सुरू

SCROLL FOR NEXT