Lumpy Vaccination Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Vaccination : मांडवे परिसरातील १८ हजार जनावरांचे तत्काळ लसीकरण

गेल्या आठवडाभरात लागण झाल्याची शंका असलेल्या पाच किलोमीटर परिसरातील १८ हजार ६०० गुरांचे तत्काळ लसीकरण करण्यात आले आहे.

टीम ॲग्रोवन

रत्नागिरी ः मांडवे (ता. खेड) येथे एका बैलाला लम्पी स्कीनची (Lumpy Skin) लागण झाल्याचा अहवाल आल्यानंतर पशुसंवर्धन (Animal Husbandry) विभागाकडून कडक उपाययोजनांवर भर देण्यात आला आहे. गेल्या आठवडाभरात लागण झाल्याची शंका असलेल्या पाच किलोमीटर परिसरातील १८ हजार ६०० गुरांचे तत्काळ लसीकरण करण्यात आले आहे.

महिनाभरात जिल्ह्यातील २ लाख ७६ हजार जनावरांचे मोफत लसीकरण करण्यात येणार आहे. खेड तालुक्यातील मांडवे परिसरात एका बैलामध्ये लम्पी स्कीनसदृश लक्षणे दिसली होती.

त्याचा अहवाल पशुसंवर्धन विभागाने तपासणीसाठी पुणे येथे पाठवला होता. तो तपासणीचा अहवाल लम्पी पॉझिटिव्ह आढळून आल्याने जि.प.चा पशुसंवर्धन विभाग अधिक दक्ष झाला आहे.

मांडवे पंचक्रोशीतील ५ किमी परिसरातील तळे, जैतापूरवाडी, कोसंबीवाडी परिसरातील गुरांचे लसीकरण केले जात आहे. रत्नागिरी जिल्ह्यात प्राथमिक टप्प्यात आतापर्यंत ३५ हजार लसींचे डोस जनावरांसाठी पशुसंवर्धन विभागाकडे उपलब्ध झालेले आहेत.

जिल्ह्यात एकूण २ लाख ७६ हजार पाळीव जनावरे आहेत. या सर्व जनावरांचे लम्पी स्कीनच्या पार्श्वभूमीवर मोफत लसीकरण करण्यात येणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT