मुक्त संचार गोठा  Agrowon
काळजी पशुधनाची

कमी खर्चातील मुक्त संचार गोठा

मुक्त संचार गोठ्याचा विचार करता, जनावरे त्यांच्या मर्जीने गोठ्यातील चारा, पाणी आणि इतर गोष्टींचा उपभोग घेत असतात.

Roshani Gole

अन्न, वस्त्र व निवारा या तीन जशा मानवाच्या मुलभूत गरजा आहेत. त्याप्रमाणे अन्नाची आणि निवाऱ्याची गरज आपल्या पशुधनालाही (livestock) असते. या दोन गोष्टींचे योग्य व्यवस्थापन केल्यास बदलत्या वातावरणाचा जनावरांवरती अतिरिक्त ताण न येता, उत्पादनात (production) सातत्य टिकून राहते.

बंदिस्त गोठ्यातील अडचणींचा विचार करता, मुक्त संचार गोठा (loose housing) समोर येऊ लागला आहे. निवाऱ्याचा मुख्य हेतू, जनावरांचे ऊन, वारा व पाऊस यांपासून संरक्षण करणे हे असते. पण जेव्हा आपण मुक्त संचार गोठ्याचा (mukt sanchar)विचार करतो. तेव्हा जनावरे त्यांच्या मर्जीने गोठ्यातील चारा, पाणी आणि इतर गोष्टींचा उपभोग घेत असतात.

बरेचदा ग्रामीण भागात पशुपालक, स्थानिक परिस्थितीचा विचार करून, जनावरांच्या निवाऱ्याची सोय करत असतात. त्यामुळे आपल्या नजरेस जनावरांच्या गोठ्याचे अनेक प्रकार पाहण्यास मिळतात. यामध्ये घराच्या एका बाजूच्या पडवीला आडोसा घेऊन किंवा राहत्या घराच्या मागील बाजूस जनावरांच्या निवाऱ्याची सोय केली जाते.

जागेची अडचण नसल्यास आधीच्या गोठ्याचे सहजरित्या मुक्त गोठ्यामध्ये रुपांतर करता येते. मुक्त गोठा तयार करताना जास्तीचा खर्च येतो, असा खुप पशुपालकांचा गैरसमज आहे. पण वास्तविक पाहता, मुक्त संचार गोठा पद्धत तशी जुनीच पण नव्याने महत्त्व प्राप्त झालेली पद्धत आहे.

यासाठी तुमच्याकडील एकूण जागेपैकी एक तृतीयांश जागेवर गोठा बांधून उर्वरित जागा मोकळी सोडली जाते. या मोकळ्या जागेला चारही बाजूने कुंपण केले जाते. एका गायीला किंवा म्हशीला मुक्त संचार गोठ्यामध्ये साधारणपणे २०० चौरस मीटर जागा लागते. आपल्याकडील जागेची एकूण उपलब्धता पाहून गोठ्यातील जनावरांची संख्या ठरवावी. म्हणजे तुमच्याकडे २ गुंठा जागा असल्यास तुम्ही १० जनावरे मोकळी सोडू शकता.

धार काढण्याची वेळ वगळता, बाकी पूर्ण वेळ जनावरे मोकळी असतात. एका संशोधनानुसार असे दिसून आले आहेकी, मुक्त संचार गोठ्यात जनावरांच्या दूध उत्पादनात वाढ होते. कारण जनावरांवरील मानसिक ताण कमी झालेला असतो. मजुर उपलब्धतेची समस्या पाहता, कमी मजुरात उत्तम व्यवस्थापन करता येते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Jairam Ramesh: अमेरिका-इराण चर्चेत पाकिस्तान बनला शांतिदूत?; मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणाला धक्का, काँग्रेसची जोरदार टीका

Fertilizer Shop License Action: जालन्यात वर्षभरात ६४ कृषी सेवा केंद्रांच्या परवान्यावर कारवाई

Goat Care in summer: उन्हाळ्यात शेळ्यांच्या आहारात काय बदल करावे?

Land Inheritance: वारसाहक्कात अपेक्षित मोठे बदल

Poultry Shed Management: उन्हाळ्यात कोंबड्यांच्या शेडचं व्यवस्थापन; मरतुक टाळण्यासाठी उपाय

SCROLL FOR NEXT