Lumpy Skin Disease Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Skin Disease : लम्पी रोग पसरवणाऱ्या किटकांचे नियंत्रण कसे कराल?

लम्पी स्किन रोगाचा प्रसार हा अनेक मार्गानी होतो. त्यापैकी चावा घेणाऱ्या किटीक वर्गीय माशा प्रमुख आहेत.

Team Agrowon

लम्पी स्किन रोगाचा (Lumpy Skin Disease) प्रसार हा अनेक मार्गानी होतो. त्यापैकी चावा घेणाऱ्या किटीक वर्गीय माशा प्रमुख आहेत. यामध्ये टॅबॅनस, स्टोमोक्सिस हिमॅटोबिया, क्यूलीकॉईडस, डास व काही प्रजातींचे गोचीडे यांचा समावेश होतो. या किटकांच्या नियंत्रणासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने पुढील उपायांची शिफारस केली आहे.

सर्व साधारणपणे - जनावराला प्रखर उन्हात चरण्यासाठी सोडू नये. जनावरांना सकाळी १० ते ५ पर्यंत गोठयातच ठेवावे. 

- शेणाचा उकिरडा किंवा खड्डा शेण टाकल्यानंतर प्लॅस्टिक पेपरने किंवा ताडपत्रीने झाकावा.

- गोठयात स्वच्छता ठेवावी. 

- जनावराच्या  शरीरावर कमीत कमी एक आठवडयाच्या अंतराने ५ टक्के निम अर्क किंवा वनस्पतीजन्य १० मिली निम तेल + १० मिली निलगीरी तेल + १० मिली करंज तेल + २ ग्रॅम अंगाचा साबण १ लिटर पाण्यात मिसळून हे द्रावण फवारावे.

गोठयाची स्वच्छता करून गोचीडाची अंडी गोळा करून शेकोटीमध्ये जाळावीत. गोठ्यातील पृष्ठभागावरिल व भिंतीवरिल भेगा फ्लेमगनने जाळाव्यात जेणेकरुन भेगांमध्ये किटकांनी घातलेली अंडी जाळली जातील. 

- आजार सदृश लक्षणे आढळल्यास जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधावा. 

- रोग नियंत्रणासाठी पशुवैद्यकाच्या सल्ल्याने जनावराचे लसीकरण करून घ्यावे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Poultry Care: ऑक्टोबर हीटचा कोंबड्यांवरील परिणाम रोखण्यासाठी महत्त्वाचे उपाय

Drinking Water Crisis: आदिवासी कातकरी वस्ती तहानलेली!

Pomegranate Research Centre: कर्नाटकच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाची राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्रास भेट

Raigad Drought Situation: रायगड जिल्ह्यावर दुष्काळाची छाया

Solapur District Bank: सोलापूर जिल्हा बँक निवडणूक मतदार यादीवर शेवटच्या दिवशी सर्वाधिक हरकती

SCROLL FOR NEXT