Goat Milk  Agrowon
काळजी पशुधनाची

Goat Milk Benefits : शेळीच्या दुधाचे आरोग्यदायी फायदे

Goat Farming : शेळीचे दूध अत्यंत गुणकारी असून, विशेषतः लहान मुलांच्या बौद्धिक विकासासाठी चांगले असते. तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त आहे.

Team Agrowon

डॉ. सचिन राऊत

शेळीचे दूध अत्यंत गुणकारी असून, विशेषतः लहान मुलांच्या बौद्धिक विकासासाठी चांगले असते. तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त आहे. आजारी व्यक्ती, पचनशक्ती चांगली नसणाऱ्यांसाठी आणि वृद्ध व्यक्ती यांच्यासाठी एक संपूर्ण आहार म्हणून शेळीचे दूध ओळखले जाते.

पशुपालन व्यवसायामध्ये मुख्यतः गाई, म्हशी, शेळी आणि मेंढी पालनाचा समावेश होतो. शेळी-मेंढीपालन व्यवसाय मुख्यतः मांस, लोकर आणि दूध उत्पादनासाठी केला जातो. शेळीपालन मुख्यत्वेकरून मांस उत्पादनासाठी केले जाते. परंतु शेळ्यापासून मिळणाऱ्या दुधाला तितके महत्त्व दिले जात नाही. या मागे कमी दूध उत्पादन, दुधाला स्वाद व वास येतो, अशी विविध कारणे दिसून येतात. मात्र असे असले तरीही शेळ्यांचे दूध हे भरपूर प्रमाणात पौष्टिक असल्याचे अभ्यासातून स्पष्ट झाले आहे.

शेळीचे दूध अत्यंत गुणकारी असून विशेषतः लहान मुलांच्या बौद्धिक विकासासाठी चांगले असते. तसेच आजारी, पचनशक्ती चांगली नसणारी आणि वृद्ध व्यक्ती यांच्यासाठी एक संपूर्ण आहार म्हणून शेळीचे दूध उपयोगी ठरते. हृदयरोग असणाऱ्यांसाठी शेळीचे दूध हे अत्यंत गुणकारी मानले जाते. शेळीचे दूध हे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त आहे.

महत्त्व आणि वैशिष्ट्ये

  • शेळीच्या दुधात रायबोफ्लोवीन (व्हिटॅमिन बी २) योग्य प्रमाणात असते. हे ॲण्टी ऑक्सिडंट असून, लाल रक्त पेशी निर्मिती, शरीरपेशींची वाढ आणि जखमा भरून येण्यासाठी होतो.

  • शेळीचे दूध कॅल्शिअमचा उत्तम स्रोत मानला जाते. कॅल्शिअममुळे हाडांचे आरोग्य चांगले राहते. आतड्याच्या कर्करोगापासून तसेच स्त्रियांमध्ये दिसून येणाऱ्या स्तनाच्या कर्करोगापासून बचाव होतो.

  • शेळीच्या दुधात पोटॅशिअम योग्य प्रमाणात असते. त्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते.

  • मधुमेह असलेल्या व्यक्तींसाठी शेळीचे दूध गुणकारी मानले जाते.

  • शेळीचे दूध पचनास अत्यंत हलके असते. कारण यामध्ये फॅट ग्लोब्युल म्हणजेच स्निग्ध पदार्थांचे घनगोल (गोळे) आकाराने छोटे असतात.

  • शेळीच्या दुधात जीवनसत्त्व ‘अ’ मुबलक प्रमाणात असते. हे जीवनसत्त्व डोळ्यांचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी फायदेशीर ठरते. तसेच रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहण्यासाठी उपयोगी असते.

  • काही लोकांना गाईच्या दुधाची ॲलर्जी असते. त्यांच्यासाठी शेळी दूध उत्तम पर्याय आहे.

  • शेळीचे दूध सेवन केल्याने त्वचा चांगली राहते. शेळीच्या दुधामध्ये ॲण्टी ऑक्सिडंट गुणधर्म असल्यामुळे त्वचा टवटवीत होते.

  • वजन वाढीसाठी शेळीचे दूध उपयुक्त ठरते.

  • शेळीच्या दुधामध्ये लिनोलीक आम्ल असते. त्यामुळे लहान मुलांच्या बौद्धिक विकासासाठी शेळीचे दूध उपयुक्त ठरते.

  • बद्धकोष्ठतेचा त्रास असलेल्या लोकांसाठी शेळी दुधाचे सेवन फायदेशीर ठरते. शेळीचे दूध पचनास अत्यंत हलके असल्याने आतड्यातील मल सहजरीत्या बाहेर काढला जातो.

  • पचनाचा त्रास, दमा, अल्सर, क्षय रोग असलेल्यांसाठी शेळीचे दूध अत्यंत उपयोगी आहे.

  • शेळीच्या दुधात पोटॅशिअम, फॉस्फरस, कॅल्शिअम, क्लोराइड, सेलेनियम, झिंक यांचे प्रमाण गाईच्या दुधाच्या तुलनेत जास्त असते. त्यामुळे कोलायटिस म्हणजेच आंत्रशोथ असणाऱ्या लोकांसाठी शेळीचे दूध चांगले असते.

  • शेळीच्या दुधामध्ये गाईच्या दुधाच्या तुलनेत जास्त पौष्टिक आणि स्वास्थ्यकारक तत्त्व असतात. शेळीच्या दुधाचे नियमितपणे सेवन केल्यास प्रकृती सशक्त होऊन आजारांपासून बचाव होतो.

  • शेळीच्या दुधामध्ये सूज प्रतिरोधक गुणधर्म असतात. त्यामुळे शरीरावरील कोणत्याही भागावर आलेली सूज कमी होण्यास मदत होते.

  • शेळीच्या दुधाचे नियमित सेवन केल्यास केसांचे आरोग्य उत्तम राखले जाते. केस गळती, केस अकाली पांढरे होणे अशा समस्या दूर ठेवण्यासाठी शेळी दूध सेवन मदत करते.

  • सांधेदुखीचा त्रास असलेल्यांसाठी शेळीचे दूध गुणकारी ठरते.

  • शेळीचे दूध हे रक्तातील प्लेटलेट्स काउंट वाढविण्यास मदत करते.

  • शेळीचे दूध पचण्यास हलके असते. त्यामुळे गॅस, आम्लपित्त अशा पोटा संबंधीच्या समस्या कमी होण्यास मदत होते.

- डॉ. सचिन राऊत, ७५८८५७१५११

(पशू शल्य चिकित्सा व क्ष किरण शास्त्र विभाग, पशुवैद्यक व पशू विज्ञान महाविद्यालय, परभणी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Natural Farming : नैसर्गिक शेतीतून शेतकऱ्यांसाठी १० लाख कोटी रुपयांची बाजारपेठ खुली होईल; केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा

Solapur Assembly Election : सोलापुरात चुरशीने मतदान, माढा, करमाळा, बार्शी, अक्कलकोटला रांगा

Forest Fire : वणव्यांमुळे जैवविविधता धोक्‍यात

Winter Update : नाशिकचा पारा १०.९ अंशांवर

Rabi Season 2024 : यंदाच्या रब्बीतही हरभराच हुकमी पीक

SCROLL FOR NEXT