Agrowon Agri Exhibition  Agrowon
काळजी पशुधनाची

Livestock Management : मुक्तसंचार गोठा, जातिवंत पैदासीवर लक्ष द्या ः डॉ. घोरपडे

Animal Care : दुग्धव्यवसाय फायदेशीर करण्यासाठी जातिवंत दुधाळ जनावरांची निवड, आरोग्य व्यवस्थापन आणि चारा नियोजन महत्त्वाचे आहे.

Team Agrowon

Sangli News : दुग्धव्यवसाय फायदेशीर करण्यासाठी जातिवंत दुधाळ जनावरांची निवड, आरोग्य व्यवस्थापन आणि चारा नियोजन महत्त्वाचे आहे. व्यस्थापनाच्या पातळीवर पालनपोषणात छोटे छोटे बदल केल्यास दुग्ध व्यवसाय फायदेशीर बनू शकतो. येत्या काळात स्वच्छ दूध निर्मितीवर लक्ष देणे आवश्यक झाले आहे, असे मत सेवानिवृत्त सहायक आयुक्त (पशुसंवर्धन) डॉ. व्यंकटराव घोरपडे यांनी येथे व्यक्त केले.

येथे सुरू असलेल्या ‘सकाळ ॲग्रोवन’ विभागीय कृषी प्रदर्शनात ‘पशू व्यवस्थापन आणि स्वच्छ दूध निर्मितीचे तंत्र’ या विषयावर डॉ. घोरपडे बोलत होते. ते म्हणाले, ‘‘अलीकडच्या काळामध्ये पशू व्यवस्थापन आव्हानात्मक ठरत आहे. जनावरांची वंशावळ, मुक्त संचार गोठा, वेळेवर औषधोपचार आणि सकस चाऱ्याची उपलब्धता आदी बाबी चांगल्या दूध उत्पादनासाठी महत्त्वाच्या आहेत.

जनावर कोणत्या प्रकारचे आहे यावर दूध उत्पादन ४० टक्क्यांपर्यंत अवलंबून असले तरी उर्वरित ६० टक्के दूध उत्पादनासाठी पशुंचे व्यवस्थापन हे महत्त्वाचे आहे. सकस चाऱ्यासाठी त्या चाऱ्याचे राखीव क्षेत्र ठेवणे ही बाब अतिशय महत्त्वाची आहे. जनावरांच्या पाण्याच्या व्यवस्थापनाबरोबरच त्याच्या प्रत्येक गोष्टींमध्ये शास्त्रशुद्धता आणणे व स्वच्छता ठेवणे हे उत्कृष्ट प्रतीच्या दूध उत्पादनासाठी महत्त्वाचे आहे.

दूध उत्पादकांनी आपण किती जनावरे पाळतो यापेक्षा त्यांचे कसे व्यवस्थापन करतो याकडे अधिक लक्ष दिल्यास दुधाच्या उत्पादनात चांगली वाढ होऊन हा व्यवसाय फायदेशीर ठरेल.’’ डॉ. घोरपडे यांनी गोठा व्यवसाय करताना कोणती काळजी घ्यावी याबाबत माहिती दिली. मकरंद पाटील व अर्चना पाटील तुजारपूर (ता. वाळवा) येथील प्रयोगशील पशुपालक दांपत्याने गोठ्यातील अनुभवाची दूध उत्पादकांशी देवाणघेवाण केली. ॲग्रोवनचे मुख्य उपसंपादक अमित गद्रे यांनी स्वागत केले.

शेतकऱ्यांचा सत्कार

दुग्धोत्पादनात यशस्वी झालेल्या संभाजी कोळेकर, बोरगाव, (ता. वाळवा), उमेश गावडे, बोरगाव, (ता. वाळवा), मानसिंग वाळखिंडे, लोणारवाडी (ता. वाळवा), सुरेश भिसे, कुंडल (ता. पलूस), आकाश व्‍हनमाने, आटपाडी (ता. आटपाडी), रमेश माळी (गीर गाई) जत (ता. जत) या शेतकऱ्यांचा या वेळी सत्कार करण्यात आला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladaki Bahin Yojana : महिलांच्या बँक खात्यावर दर महिन्याला १५०० रुपयांऐवजी २१०० रुपये जमा होणार का?

Nanded Assembly Constituency : नांदेडमध्ये तीन नवख्यांना मिळाली आमदारकीची संधी

Agrowon Podcast : मका दरात काहिशी सुधारणा

Parliament Winter Session : अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांचा गदारोळ; लोकसभेसह राज्यसभेचं कामकाज २७ नोव्हेंबरपर्यंत तहकूब

Land Record Registration : गुंता इतर हक्क नोंदीचा

SCROLL FOR NEXT