Nanded Assembly Constituency : नांदेडमध्ये तीन नवख्यांना मिळाली आमदारकीची संधी

Maharashtra Election 2024 : नांदेड जिल्ह्यामध्ये नऊ विधानसभांपैकी भारतीय जनता पार्टीला ५ जागा, शिवसेना ३, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी १ अशा एकूण ९ जागा निवडून आल्या आहेत.
Nanded MLA
Nanded MLAAgrowon
Published on
Updated on

Nanded News : जिल्ह्यातील नऊ विधानसभेचे निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. किनवट येथून भाजपचे भीमराव केराम, हदगावमधून शिवसेनेचे बाबूराव कदम कोहळीकर, भोकरमधून भाजपच्या श्रीजया चव्हाण, नांदेड उत्तरमधून शिवसेनेचे बालाजी कल्याणकर, नांदेड दक्षिणमधून शिवसेनेचे आनंद तिडके, लोहा मधून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रताप चिखलीकर, नायगावमधून भाजपचे राजेश पवार, देगलूरमधून भाजपचे जितेश अंतापूरकर तर मुखेडमधून डॉ. तुषार राठोड हे विजयी झाले आहेत. यावेळी श्रीजया चव्हाण, आनंद तिडके, बाबुराव कोहळीकर या नवख्यांना आमदारकीची संधी मिळाली आहे.

नांदेड जिल्ह्यामध्ये नऊ विधानसभांपैकी भारतीय जनता पार्टीला ५ जागा, शिवसेना ३, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी १ अशा एकूण ९ जागा निवडून आल्या आहेत. किनवटमध्ये भाजपचे भीमराव रामजी केराम यांनी राष्ट्रवादी (पवार) प्रदीप जाधव यांचा ५६३६ एवढ्या मतांनी पराभव केला आहे. हदगाव विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे उमेदवार बाबूराव कदम कोहळीकर यांनी भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे उमेदवार माधवराव पाटील जवळगावकर यांचा ३००६७ एवढ्या मतांनी पराभव केला आहे.

भोकर विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार श्रीजया अशोक चव्हाण यांनी भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे तिरूपती ऊर्फ पप्पू बाबूराव कदम कोंढेकर यांचा ५० हजार ५५१ मतांनी पराभव केला आहे. नांदेड उत्तर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे उमेदवार बालाजी कल्याणकर यांनी कॉंग्रेसचे अब्दुल सत्तार अ गफूर यांचा ३५०२ एवढ्या मतांनी पराभव केला आहे. यात बालाजी कल्याणकर यांना ८३ हजार १८४ मते मिळाली तर अब्दुल सत्तार अ गफूर यांना ७९ हजार ६८२ मते मिळाली आहेत.

Nanded MLA
Sindkhedraja Assembly Constituency : सिंदखेडराजात काका-पुतणी रिंगणात

नांदेड दक्षिण विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार आनंद तिडके यांनी कॉंग्रेसचे मोहन हंबर्डे यांचा २१३२ एवढ्या मतांनी पराभव केला आहे. यात आनंद तिडके यांना ६० हजार ४४५ मते मिळाली तर मोहनराव हंबर्डे यांना ५८ हजार ३१३ मते मिळाली आहेत. लोहा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे प्रताप पाटील चिखलीकर यांनी शिवसेना (ठाकरे)चे एकनाथ पवार यांचा १० हजार ९७३ एवढ्या मतांनी पराभव केला आहे. यात चिखलीकर यांना ७२ हजार ७५० मते मिळाली तर एकनाथ पवार यांना ६१ हजार ७७७ मते मिळाली आहेत.

नायगाव विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे राजेश पवार यांनी कॉंग्रेसचे उमेदवार डॉ. मीनल पाटील खतगावकर यांचा ४७ हजार ६२९ मतांनी पराभव केला आहे. यात राजेश पवार यांना १ लाख २९ हजार १९२ मते मिळाली तर डॉ. मीनल पाटील खतगावकर यांना ८१ हजार ५६३ मते मिळाली आहेत.

Nanded MLA
Satara Assembly Constituency Result : सातारा जिल्ह्यात आठही जागांवर महायुतीचा करिष्मा

देगलूर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे जितेश रावसाहेब अंतापूरकर यांनी कॉंग्रेसचे उमेदवार निवृत्ती कांबळे यांचा ४२ हजार ९९९ एवढ्या मतांनी पराभव केला आहे. या निवडणुकीमध्ये जितेश अंतापूरकर यांना १ लाख ०७ हजार ८४१ मते मिळाली तर निवृत्ती कांबळे यांना ६४ हजार ८४२ मते मिळाली आहेत.

मुखेड विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे तुषार राठोड यांनी राष्ट्रीय कॉंग्रेसचे उमेदवार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांचा ३७ हजार ७८४ मतांनी पराभव केला आहे. यात तुषार राठोड यांना ९८ हजार २१३ मते मिळाली तर हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांना ६० हजार ४२९ मते मिळाली आहेत. बालाजी खतगावकर यांना ४८ हजार २३५ तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com