Purnathadi Buffalo Agrowon
काळजी पशुधनाची

Purnathadi Buffalo : अखेर पूर्णाथडी म्हशीला मिळाले राष्ट्रीय मानांकन

भारतीय कृषी संशोधन केंद्रांतर्गत राष्ट्रीय पशू आनुवंशिकी संसाधन ब्युरो, कर्नाल (हरियाना) यांच्या वतीने नुकत्याच भारतातील नवीन नोंदणीकृत पशुधनाची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

टीम ॲग्रोवन

अकोला ः भारतीय कृषी संशोधन (ICAR) केंद्रांतर्गत राष्ट्रीय पशू आनुवंशिकी संसाधन ब्युरो, कर्नाल (हरियाना) यांच्या वतीने नुकत्याच भारतातील नवीन नोंदणीकृत पशुधनाची (Registered Livestock) यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यात पश्‍चिम विदर्भातील पूर्णाथडी म्हशीला (Purnathadi Buffalo) राष्ट्रीय मान्यता (Natinal Rating For Purnathadi Buffalo) देण्यात आली आहे. ‘माफसू’च्या शास्त्रज्ञांनी या म्हशीचा अभ्यास करून प्रस्ताव दिला होता.

पूर्णा नदीच्या खोऱ्यात आढळणाऱ्या फिकट राखाडी रंगाच्या म्हशीला राजाश्रय मिळावा, तिची स्वतंत्र ओळख असावी, या उद्देशाने भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या राष्ट्रीय पशू आनुवंशिकी संसाधन विभागाकडे प्रस्ताव दाखल केला होता. तो आता मार्गी लागला आहे.

पूर्णाथडी म्हशीची वैशिष्ट्ये

- पारंपरिक जात म्हणून ओळख

- रंगाने फिकट राखाडी

- पश्‍चिम विदर्भातील अमरावती, अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यांतील पूर्णा नदीकाठच्या भागांत विशेषत्वाने आढळते.

- स्थानिक पातळीवर भुरी, राखी, गावळी या नावांनी ओळख

- मध्यम आकारमान, दुधातील स्निग्धाचे उच्च प्रमाण, उत्तम प्रजनन क्षमता, कमी व्यवस्थापन खर्च

- विदर्भातील उष्ण हवामानात तग धरून राहण्याची क्षमता

पूर्णाथडीची पैदासक्षेत्रे

पश्‍चिम विदर्भात अमरावती, अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यांतून वाहणाऱ्या पूर्णा नदीकाठच्या परिसरात या भुऱ्या रंगाच्या म्हशी आढळतात. अमरावती जिल्ह्यात दर्यापूर, अचलपूर व अंजनगावसूर्जी, अकोला जिल्ह्यातील अकोट, तेल्हारा व अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यांतील शेगाव, संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुके, तसेच लगतची गावे हे पूर्णाथडी म्हशीचे पैदासक्षेत्र म्हणता येईल.

विशेष गुणधर्मामुळे लघू आणि मध्यम म्हैसपालकांमध्ये ही म्हैस विशेष लोकप्रिय आहे. पूर्णाथडी म्हैस दिवसाला साधारणतः ४ ते ५ लिटर दूध देते. एका वेतात (सरासरी २५० दिवस) १००० किलोग्रॅम दूध देते. दोन वेतांतील अंतर सरासरी ४५० दिवस आहे. पहिल्यांदा विण्याचे वय हे साधारण ५ वर्षे एवढे आढळते. पूर्णाथडीच्या दुधात स्निग्धाचे प्रमाण सरासरी ८.५ टक्के आहे. त्यामुळे स्थानिक म्हैसपालकांनी पूर्णाथडी म्हशीस निवड करण्यास नेहमीच झुकते माप दिले आहे.

नागपूरच्या महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. कर्नल आशीष पातूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली अकोला येथील स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्थेतील पूर्णाथडी म्हशीचे अभ्यासक प्रा. डॉ. शैलेंद्र कुरळकर, डॉ. एस. साजिद अली यांनी कर्नाल येथील डॉ. विकास व्होरा आणि डॉ. आर. एस. कटारिया या शास्त्रज्ञांच्या समन्वयातून शास्त्रोक्त अभ्यास करून या म्हशीला राष्ट्रीय मानांकन प्राप्त करण्यासाठी प्रयत्न केले.

सद्यःस्थितीत महाराष्ट्रात नागपुरी, पंढरपुरी आणि मराठवाडी या प्रमुख जाती असून, आता यात पूर्णाथडी म्हशींची जात नव्याने समाविष्ट झाली आहे. संस्थेचे सहयोगी अधिष्ठाता प्रा. डॉ. धनंजय दिघे यांनी प्रा. कुरळकर आणि डॉ. अली यांचे अभिनंदन केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

APMC Chairperson, Vice-Chairperson Allowances: बाजार समिती सभापती, उपसभापतिंच्या मानधनात वाढ

Solar Power Project: सामूहिक सिंचनासाठीचा सौरऊर्जा प्रकल्प आदर्श: वळसे पाटील

Agricultural Issues: शेतीप्रश्न गांभीर्याने घ्या: शरद पवार

Pune Heavy Rainfall: पुणे जिल्ह्यात पावसाचे थैमान

Ahilyanagar Heavy Rainfall: अहिल्यानगरला दुसऱ्या दिवशी अठरा मंडलांत अतिवृष्टी

SCROLL FOR NEXT