Livestock Market Agrowon
काळजी पशुधनाची

Livestock Market : गायींच्या खरेदीवेळी शेतकऱ्यांनी सजग राहणे आवश्यक

Cow Market : दुधाळ जनावरे त्यातही प्रामुख्याने गायींच्या खरेदीवेळी शेतकऱ्यांनी सजग राहणे आवश्यक आहे. शबरी महामंडळाकडून वेळोवेळी याबाबत प्रशिक्षण देण्यात येते.

Team Agrowon

Nashik News : दुधाळ जनावरे त्यातही प्रामुख्याने गायींच्या खरेदीवेळी शेतकऱ्यांनी सजग राहणे आवश्यक आहे. शबरी महामंडळाकडून वेळोवेळी याबाबत प्रशिक्षण देण्यात येते. त्याला उपस्थित राहून शिक्षण घेणे आवश्यक, असल्याचे प्रतिपादन सुरगाणा पशुधन विकास अधिकारी डॉ. संतोष शिंदे यांनी केले.

शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्यादित नाशिक आणि पंजाब नॅशनल बँक सुरगाणा यांच्या संयुक्त विद्यमाने पथदर्शी दुग्ध व्यवसाय प्रकल्पांतर्गत कुकोडणे गावामध्ये दुग्ध व्यवसाय व व्यवसाय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.

या वेळी ते बोलत होते. या वेळी सुरगाणा पशुधन विकास अधिकारी डॉ. अविनाश अनंतवार, शबरी आदिवासी व वित्त विकास महामंडळाचे सल्लागार शेषराव ससाणे, पशुतज्ज्ञ डॉ. संगमेश्वर पांचाळ आदी उपस्थित होते.

या वेळी कुकोडणे, प्रगत विहीर, गुहे, चिंचपाडा गावातील संयुक्त दायित्व गटातील दोनशेहून अधिक प्रतिनिधी उपस्थित होते.

या वेळी डॉ. शिंदे म्हणाले, की गायींची खरेदी करताना कोणत्या बाबी तपासल्या जाव्यात, गायींची काळजी घेताना कोणत्या बाबी प्रामुख्याने बघाव्या, वासराचे संगोपन कसे करावे, गोठा स्वच्छ कसा ठेवावा, गोठ्याचे व्यवस्थापन करत असताना मुक्तसंचार गोठा ही संकल्पना कशी राबवावी, याविषयी त्यांनी माहिती दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agricultural Credit: शेतीसाठी बँक कर्जवाटपात आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, कर्नाटक आघाडीवर

Manmad APMC: राजकारणापेक्षा बाजार समिती, शेतकरी महत्त्वाचा 

Farmer Protest: शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष देण्याची किसान युनियनची मागणी

Crop Insurance Compensation: गतवर्षीची पीकविमा भरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग

Warana Agri Expo: वारणा कृषी प्रदर्शनाचे उद्‍घाटन

SCROLL FOR NEXT