Livestock Market Agrowon
काळजी पशुधनाची

Livestock Market : शिराळ्याच्या जनावरे बाजारात १७ लाखांची उलाढाल

Animal Care : शिराळा येथे बाजार समितीतर्फे भरवण्यात आलेल्या जनावरांच्या बाजारास शेतकरी व व्यापाऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

Team Agrowon

Sangli News : शिराळा येथे बाजार समितीतर्फे भरवण्यात आलेल्या जनावरांच्या बाजारास शेतकरी व व्यापाऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या बाजारात सुमारे १७ लाखांची उलाढाल झाली आहे. शिराळा येथे गेल्या सव्वा महिन्यापासून जनावरांच्या बाजारास सुरुवात झाली आहे.

सव्वा महिन्यात पाच लाखांपासून २५ लाखांपर्यंत उलाढाल वाढू लागली आहे. शिराळा बाजार समितीच्या जनावरांच्या बाजारात सातारा, कराड, तळसंदे, कोलोली, केर्ली, पुनाळ, सांगोला, कोल्हापूर, शाहूवाडी या परिसरातील प्रसिद्ध व्यापाऱ्यांनी हजेरी लावली. या वेळी गायी, म्हैशी, बैल, वासरे, शेळ्या यांची विक्री होऊन सुमारे १७ लाखांची उलाढाल झाली.

शिराळा तालुक्यात ७० ते १०० वर्षांची परंपरा असणारे मांगले व चरण येथे भरत असणारे जनावरे बाजार कोरोना काळ व इतर अडचणीमुळे बाजार बंद झाले आहेत. तालुक्यातील शेतकऱ्यांना व व्यापाऱ्यांना जनावरे खरेदी व विक्री करण्यासाठी वडगाव व कराड या ठिकाणी जावे लागत होते.

त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत होते. या बाजारामुळे शेतकऱ्यांचा वेळ व पैसा वाचणार आहेत. शेतकऱ्यांची फसवणुकी होणार नाही. हा बाजार कायमस्वरूपी सुरू राहावा यासाठी बाजार समितीमार्फत सर्व सुविधा पुरवण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.

शिराळा येथे गेल्या सव्वा महिन्यापासून सुरू केलेल्या जनावरे बाजाराला चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा वाढता प्रतिसाद पाहून बाजारात म्हैस, गायी, बैल, शेळी, जनावरांना लागणारे शोभेच्या साहित्याचा स्टॉल सुरू झाला आहे. त्यामुळे साहित्य व जनावरे खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी होत आहे, असे बाजार समितीचे सचिव जी. बी. पाटील यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT