Lumpy Skin Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Skin : ठाणे जिल्ह्यात मृत ५६ जनावरांसाठी भरपाई

नैसर्गिक आपत्ती अथवा लम्पी आजार अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे. लम्पीने बाधित जनावरांची संख्या स्‍थिरस्‍थावर होत असताना या आजाराने मृत्यू होणाऱ्या जनावरांच्या संख्येत वाढ होत आहे.

टीम ॲग्रोवन

ठाणे : नैसर्गिक आपत्ती अथवा लम्पी आजार (Lumpy Skin) अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे. लम्पीने बाधित जनावरांची संख्या स्‍थिरस्‍थावर होत असताना या आजाराने मृत्यू (Animal Death) होणाऱ्या जनावरांच्या संख्येत वाढ होत आहे.

त्यानुसार जिल्ह्यात ७८ जनावरांचा या आजाराने मृत्यू झाला असून, त्यापैकी ५६ जनावरांच्या पशुपालकांना सरकारचा मदतीचा हात मिळाला असून त्यांच्या खात्यावर मदतीची रक्कम जमा करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. समीर तोडणकर यांनी दिली आहे.

ठाणे जिल्ह्यातील शहापूर, अंबरनाथ, कल्याण, भिवंडी पाठोपाठ ठाणे शहरातील मुंब्रा परिसरातील जनावरांमध्ये लम्पी आजाराची लागण झाल्याचे आढळून आल्यानंतर जिल्हा पशुसंवर्धन विभागासह स्थानिक स्वराज्य संस्थांतील पशुवैद्यकीय विभागाने कंबर कसत, या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी उपाययोजना करण्यास सुरुवात केली. या आजाराने बाधित झालेल्या जनावरांची संख्या थेट ८५९ वर पोहोचली आहे. तर मृत्यू होणाऱ्या जनावरांची संख्या ७८ वर पोहोचली आहे.

आजार नियंत्रणाखाली

लम्पी रोगाने बाधित पशुधनावरील उपचाराचा सर्व खर्च राज्य सरकारमार्फत मोफत करण्यात येत असून, लसीकरण, उपचार व शवविच्छेदन या सेवा पशुसंवर्धन विभागामार्फत मोफत दिल्या जात आहेत. तसेच मृत पावलेल्या जनावरांमध्ये दुधाळ जनावरांसाठी ३० हजार रुपये, ओढकाम करणाऱ्या जनावरासाठी २५ हजार आणि मृत वासरासाठी १६ हजार रुपये भरपाई देण्यात येणार असल्‍याची माहिती विभागाकडून देण्‍यात आली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT