Poultry Breed Agrowon
काळजी पशुधनाची

Poultry Breed : कोंबड्यांच्या संकरित जातींची वैशिष्ट्ये

Indigenous Chickens Breed : आजमितीला जगभरात कोंबड्यांच्या सुमारे ३०० जाती आहेत. देशात देशी कोंबड्यांच्या साधारण १९ जातींना म्हणून ओळखले जाते. अंडी आणि मांस उत्पादन वाढविण्याच्या दृष्टिने दोन जातींच्या संकरातून नवीन संकरित किंवा मिश्र जातीच्या कोंबड्यांच्या जाती विकसित करण्यात आल्या आहेत.

Team Agrowon

डॉ. ओम पवार, डॉ. दर्शना भैसारे,

डॉ. मुकुंद कदम, डॉ. हर्षल बोकडे

आजमितीला जगभरात कोंबड्यांच्या सुमारे ३०० जाती आहेत. देशात देशी कोंबड्यांच्या साधारण १९ जातींना म्हणून ओळखले जाते. अंडी आणि मांस उत्पादन वाढविण्याच्या दृष्टिने दोन जातींच्या संकरातून नवीन संकरित किंवा मिश्र जातीच्या कोंबड्यांच्या जाती विकसित करण्यात आल्या आहेत.

उपयुक्ततेनुसार साधारणतः मांसल, अंडी उत्पादक, शोभीवंत अशा विविध प्रकारांत कोंबड्यांच्या जातींचे वर्गीकरण केले जाते. शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पादन वाढविण्यासाठी काही नवीन संकरित जातींच्या संगोपन फायदेशीर ठरू शकते. त्यासाठी गुणवैशिष्ट्ये विचारात घेऊन कुक्कुटपालनासाठी जातीची निवड करावी.

कॅरी देवेंद्र

केंद्रीय पक्षी संशोधन संस्था, इज्जतनगर (उ. प्रदेश) यांच्याद्वारे विकसित.

प्रामुख्याने अंडी व मांस उत्पादनासाठी उपयुक्त.

या जातीचे पक्षी १२ आठवड्यांत १.७ ते १.८ किलो वजनापर्यंत भरतात.

अंडी उत्पादन वय ः १५५ ते १६० दिवस.

प्रतिवर्षी १९० ते २०० अंडी उत्पादन.

खाद्याचे मांसात रूपांतर करण्याची क्षमता ः २.५ ते २.६ इतकी असते.

कॅरीब्रो विशाल

केंद्रीय पक्षी संशोधन संस्था, इज्जतनगर (उ. प्रदेश) यांच्याद्वारे विकसित.

प्रामुख्याने मांस उत्पादनासाठी संगोपन केले जाते.

पक्ष्याचे वजन साधारण ६ आठवड्यांत १.६५ ते १.७ किलोपर्यंत तर सातव्या आठवड्यात २ ते २.१५ किलोपर्यंत भरते.

खाद्याचे मांसात रूपांतर करण्याची क्षमता १.८५ इतकी असते.

कॅरीब्रो मृत्युंजय

केंद्रीय पक्षी संशोधन संस्था, इज्जतनगर (उ. प्रदेश) यांच्याद्वारे विकसित.

प्रामुख्याने मांस उत्पादनासाठी वाढविली जाते.

पक्ष्याचे वजन साधारण ७ आठवड्यांत १.८ ते २ किलोपर्यंत भरते.

खाद्याचे मांसात रूपांतर करण्याची क्षमता १.९५ इतकी.

कॅरीब्रो ट्रोपिकाना

केंद्रीय पक्षी संशोधन संस्था, इज्जतनगर (उ. प्रदेश) यांनी ही जात विकसित केली.

ही जात ब्रॉयलर आणि नेकेड नेक फ्रीजल या दोन जातींची संकर आहे.

प्रामुख्याने मांस उत्पादनासाठी वाढविली जाते.

सहा आठवड्यांत साधारण १.८ किलोपर्यंत वजन भरते.

खाद्याचे मांसात रूपांतर करण्याची क्षमता २.११ इतकी असते.

हिटकॅरी

केंद्रीय पक्षी अनुसंधान संस्थान, इज्जतनगर (उ. प्रदेश) या संस्थेने विकसित केली आहे.

ही जात कॅरी रेड आणि नेकेड नेक या दोन जातींची संकर आहे.

प्रामुख्याने उष्ण हवामान व जास्त आर्द्रता असलेल्या ठिकाणासाठी योग्य.

अंडी उत्पादनाचे वय १७२ दिवस असून प्रतिवर्षी १७४ अंडी उत्पादित करते.

कॅरीश्यामा

केंद्रीय पक्षी संशोधन संस्था, इज्जतनगर (उ. प्रदेश) या संस्थेद्वार विकसित.

ही जात कडकनाथ आणि कॅरी रेड या दोन जातींची संकर आहे.

या कोंबड्यांचे मांस रंगाला काळे असते.

मांस व अंड्यामध्ये लोहयुक्त पदार्थांचे प्रमाण जास्त असल्याने त्यांना औषधीयुक्त मानले जाते.

अंडी उत्पादन वय ः १८० दिवस.

प्रतिवर्षी १०५ अंडी उत्पादन.

उपकॅरी

केंद्रीय पक्षी अनुसंधान संस्थान, इज्जतनगर (उ. प्रदेश) या संस्थेद्वारे विकसित.

स्थानिक जात, फ्रिजल आणि कॅरी रेड या तीन जातींची संकर ही जात आहे.

रोगप्रतिकारक क्षमता तसेच उष्ण हवामानामध्ये तग धरण्याची क्षमता जास्त असते.

जास्त अंडी उत्पादन क्षमता. अंडी उत्पादन वय १७० ते १८० दिवस.

प्रतिवर्ष अंडी उत्पादन ः १६५ ते १८० अंडी.

कॅरी सोनाली

केंद्रीय पक्षी संशोधन संस्था, इज्जतनगर (उ. प्रदेश) या संस्थेने १९९२ मध्ये विकसित केली आहे.

ही जात व्हाइट लेघहॉर्न नर आणि रोड आइलैन्ड रेड मादी यांचे संकर.

या कोंबड्यांची अंडी तपकिरी रंगाची असतात.

अंडी उत्पादन वय ः १५५ दिवस.

७२ आठवड्यामध्ये साधारण २८० अंडी देतात.

कॅरी निर्भिक

केंद्रीय पक्षी अनुसंधान संस्थान, इज्जतनगर (उ. प्रदेश) या संस्थेने ही जात विकसित केली आहे.

असील आणि कॅरी रेड या दोन जातींची संकर.

नर पक्षी ३ ते ४ किलो आणि मादी पक्षी २ ते ३ किलो वजनापर्यंत वाढतात. १० आठवड्यांत १.३५ किलोपर्यंत वजन मिळते.

अंडी उत्पादन वय ः १७६ दिवस.

प्रतिवर्षी अंडी उत्पादन ः १९८ अंडी.

कॅरी प्रिया

केंद्रीय पक्षी संशोधन संस्था, इज्जतनगर (उ. प्रदेश) या संस्थेने विकसित केली आहे.

व्हाइट लेघहॉर्न नर रोड आइलैन्ड रेड मादी यांच्या संकर.

अंडी उत्पादन वय ः १३३ दिवस.

७२ आठवड्यांमध्ये २९० ते ३०० अंडी देतात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sowing Season: देशात मागील वर्षीच्या तुलनेत पेरणीला वेग; मॉन्सूनची शेतकऱ्यांना साथ

Banana Cluster : नांदेडमध्ये ‘केळी’साठी क्लस्टर मंजुरीच्या आशा पल्लवित

Flower Export : निर्यातक्षम फूल उत्पादकांचा हब होण्यासाठी मदत करणार

Crop Insurance Scheme : नांदेडला पीकविमा योजनेत सात लाख २३ हजार अर्ज

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहीणींना रक्षाबंधनाच्या आधीच मिळणार 'गिफ्ट'; सरकार खात्यात पैसे जमा करणार 

SCROLL FOR NEXT