Devani Cow Agrowon
काळजी पशुधनाची

Devani Govansh Research Center : गोवंश संशोधन केंद्र देवणीतच हवे

Animal Care : देवणी गोवंशाने तालुक्याचे नाव राज्यासह देशभरात गौरवण्यात आले, मात्र राजकीय अनास्थेमुळे देवणी गोवंश संशोधन केंद्र परजिल्ह्यात जाण्यासह गोवंश संवर्धन व संगोपणासाठी सर्वच स्तरातून दुर्लक्ष झाले आहे.

Team Agrowon

Latest Agriculture News : देवणी गोवंशाने तालुक्याचे नाव राज्यासह देशभरात गौरवण्यात आले, मात्र राजकीय अनास्थेमुळे देवणी गोवंश संशोधन केंद्र परजिल्ह्यात जाण्यासह गोवंश संवर्धन व संगोपणासाठी सर्वच स्तरातून दुर्लक्ष झाले आहे. पशुचे मुळ, पैदास अन् संगोपन देवणी अन् संशोधन केंद्र परजिल्ह्यात गेल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांतून नाराजी व्यक्त होत असून ते देवणी तालुक्यातच करण्याची मागणी होत आहे.

सीमाभागाची व देवणी तालुक्याची महाराष्ट्रासह देशभरात वेगळी ओळख निर्माण करण्यात देवणी वळुचे नाव अग्रस्थानी घ्यावे लागेल. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षातही देवणी वळूने आपली वेगळी ओळख कायम ठेवली असून दिल्ली येथील पशुप्रदर्शनात सर्वाधिक वेळा परितोषिक पटकावण्याचा मान मिळवला आहे.

देवणी प्रजातींच्या गायी ओला, कोरडा, निकृष्ट चारा खाऊन ऊन वारा, पाऊस आणि थंडी सहन करूनही भरपूर दुध आणि शेतीकामाला मजबूत देखणे बैल देतात. त्यामुळे देवणी गोपालक या जनावरांना पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळतात.

देवणी भागासह बालाघाटच्या डोंगररांगात हजारो एकर गवताळ चरणाचे कुरण अस्तित्वात होते. १७ व्या शतकापासून गुजरात राज्यातून गीर जातीच्या जनावरांचे कळप मराठवाड्यात चाऱ्‍याच्या शोधात येत असत. तत्कालीन पशुपालक त्या काळात गीर आणि स्थानिक जनावरांचे संकर घडवून आणत असत. त्यातून जन्मलेली वासरे आकर्षक बाह्य गुणांची असल्यामुळे शेतकऱ्‍यांना याबद्दल आवड निर्माण झाली.

त्यातूनच देवणी गायींची निर्मिती झाली. निजामाच्या काळात या जातीच्या विकासासाठी चराऊ कुरणाकरीता गायरान आणि शकडो एकर जमिनी देण्यात आल्या. मात्र स्वातंत्र्याच्या सात दशकानंतरही या जातीबद्दल अनास्था अन् दुर्लक्ष कायम असून लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी यांनी या गोवंश संवर्धनाबदल सकारात्मकता दाखवली नसल्याचे चित्र आहे.

तब्बल ७३ हजार ‘देवणी’ जनावरे

१८ व्या पशुगणनेनुसार देवणी जातीच्या जनावरांची एकूण संख्या ७३०९८ आहे. मराठवाड्यातील जास्तीत जास्त तापमान व कडाक्याच्या थंडीत शिवाय सरासरी ८०० मिलिमीटर पर्जन्यमानातील पट्ट्यात देवणी वळू अतिशय उपयुक्त आहे. कान मोठे, लांब आणि समोर उघडे असलेले, आतून काळे आणि वक्रकार टोक असलेले असतात. त्वचा ढिली, मध्यम जाडीची पोळी लोंबती मोठी असते.

देवणी वळुसंदर्भात लोकभावनेचा अनादर करण्यात आलेला आहे. देवणी वळुची मुळ पैदास, संकर अन अदिवास देवणी भागातच राहिलेला आहे. त्यामुळे देवणी परिसरातच संशोधन कार्य अपेक्षित आहे. मात्र बीड येथे देवणी संशोधन केंद्र ही कल्पनाच करता येणार नाही. निजामकाळापासून अस्तित्वात असलेल्या या पशुविषयी नक्कीच अनादर होत आहे. लगतच्या कर्नाटक अन आंध्र प्रदेशात या मुळ भागात संशोधन केंद्र होतात अन आपल्याकडे जिल्ह्याबाहेर. याबाबत नक्कीच प्रशासकीय स्तरातून आत्मपरिक्षण होणे गरजेचे आहे.
- अनिल पाटील, देवणी वळू अभ्यासक जवळगा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

GM Crops: जीएम आणि जनुकीय संपादित तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांना फायदा होईल का?; तज्ज्ञ म्हणतात...

Chhagan Bhujbal: मराठा आरक्षणाविरोधात छगन भुजबळ न्यायालयात जाणार; कागदपत्रांची बारकाईने पडताळणी सुरू

Shikshanratna Award: डॉ. साताप्पा खरबडे यांचा शिक्षणरत्न पुरस्काराने सन्मान

Poultry Industry : फ्रोझन चिकनवरील जीएसटी हटवण्याची मागणी

UP Kharif Sowing: उत्तर प्रदेशात यावर्षीच्या खरीप हंगामात बंपर पीक उत्पादन अपेक्षित

SCROLL FOR NEXT