Lumpy Skin
Lumpy Skin Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Skin : ‘रोगग्रस्त जनावरांसाठी छावण्या कराव्यात’

टीम ॲग्रोवन

कोल्‍हापूर : लम्पी स्कीन रोगाबाधित (Lumpy Skin Disease) जनावरांचे विलगीकरण करून शासनाने त्यांच्यासाठी छावण्या तयार कराव्यात, यासह अन्य मागण्या कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) (Gokul) ने केल्या आहेत.

अध्यक्ष विश्वास पाटील यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना निवेदन दिले.

बाधित जनावरांचे विलगीकरण करून त्यांच्या छावण्या तयार करणे, ग्रामपंचायतीमार्फत लम्पी स्कीन रोगाबाबत जनजागृती करणे, डास, माश्या, गोचीड प्रतिबंधात्मक कीटकनाशक औषधाची फवारणी करून स्वच्छता मोहीम राबवणे,

गांवामधील लम्पी स्कीन बाधित जनावरांच्या ग्रामपंचायतीमार्फत नोंदी घेऊन पशुसंवर्धन विभागास कळवणे, मृत जनावरांच्या मृतदेहाची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीने घ्यावी,

बाहेरून जिल्ह्यामध्ये येणाऱ्या जनावरांचे लम्पी स्कीन प्रतिबंधक लसीकरण केल्याची खात्री करूनच प्रवेश द्यावेत. ही रोग फक्त गाय वर्गामध्ये होत असल्याने बाहेर राज्यांतून

म्हशी खरेदीस शासनामार्फत परवानगी द्यावी, अशा मागण्या गोकुळच्या वतीने करण्यात आल्या आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : दोन दिवस पावसाचा जोर राहणार; राज्यात ठिकठिकाणी वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला

Crop Loan Distribution : तीन हजार कोटींच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट

Tur Farming : तूर पिकाकडे वाढतो शेतकऱ्यांचा कल

Amarvel Control : सामूहिक प्रयत्नांमधूनच अमरवेल नियंत्रण शक्य

Food Distribution System : अन्नधान्य वितरणासाठी राज्य, केंद्र शासनाच्या योजना

SCROLL FOR NEXT