Animal care Agrowon
काळजी पशुधनाची

Cow Conservation : गोवंश संवर्धन करणे काळाजी गरज

विषजन्य औषधी व खतांच्या अतिवापरामुळे होत असलेले दुष्परिणाम टाळण्याकरिता सेंद्रिय शेती व पंचगव्य औषधीशिवाय पर्याय नाही.

Team Agrowon

Animal Husbandry News अकोला ः विषजन्य औषधी व खतांच्या अतिवापरामुळे होत असलेले दुष्परिणाम टाळण्याकरिता सेंद्रिय शेती (Organic Farming) व पंचगव्य औषधीशिवाय पर्याय नाही. त्यामुळे गोवंश सवंर्धन (Bovine Conservation) करणे ही काळाजी गरज बनली आहे, असा सूर येथे आयोजित चर्चासत्रात वैज्ञानिकांनी व्यक्त केला.

आत्मा व स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्थेच्या संयुक्त विद्यमाने पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्थेच्या सभागृहात हे चर्चासत्र झाले.

या वेळी राज्य पशुवैद्यकीय परिषदेचे अध्यक्ष डॉ. अजय पोहरकर, भारतीय पशुकल्याण बोर्डचे सदस्य सुनील मानसिंहका, आदर्श गोसेवा एवं अनुसंधान प्रकल्पाचे विवेक बिडवाई, स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्थेचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. डी. जी. दिघे, प्रकल्‍प संचालक डॉ. प्रशांत कपले, आत्मा प्रकल्प संचालक आरीफ शाह आदी उपस्थित होते.

‘पंचगंव्य औषधी व गो-आधारित पदार्थ निर्मिती’ प्रशिक्षण कार्यशाळेत पंचगंव्य औषधी व गो-आधारित पदार्थांचे महत्त्व याबाबत वैज्ञानिकांनी मार्गदर्शन केले.

सुनील मानसिंहका म्हणाले, ‘‘रासायनिक खतांमुळे उत्पादनात वाढ झाली असली, तर त्यांचा परिणाम मानवी आरोग्य व जमिनीच्या सुपीकतेवर होत आहे.

गायीपासून उत्पादित होणाऱ्या पंचगंव्य औषधी व गो-आधारित पदार्थांच्या वापरामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होण्यास मदत होईलच शिवाय निरोगी राहण्यास मदत होईल.

’’ डॉ. पोहरकर यांनी गो-आधारित संशोधनावर भर देण्याची आवश्यक असून, पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्थेचा पुढाकार कौतुकास्पद आहे.

पंचगव्य औषधीवर केलेले संशोधन नागरिकांपर्यंत पोहोचवा. आयुर्वेदिक शास्त्रात पंचगव्य औषधीचे महत्त्व सांगितले आहे, असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्‍प संचालक डॉ. प्रशांत कपले यांनी केले. सूत्रसंचालन मनीष इंगोले यांनी, तर आभार डॉ. दिलीप बदुकले यांनी मानले.

पंचगव्य म्हणजे काय?

गाईचे दूध, दही, तूप, गोमूत्र आणि शेण या पाच गोष्टींच्या मिश्रणाला पंचगव्य म्हणतात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT