Team Agrowon
जनावराला निकृष्ट चाऱ्यासोबत गूळ, मळी, मका, भरड यासारखे तात्काळ ऊर्जापुरवठा करणारे पदार्थ द्यावेत.
नावरांना योग्य मात्रेत नत्र व सल्फरयुक्त क्षार मिश्रण द्यावं.
वाळल्या चाऱ्याचा पशुआहारात जास्त प्रमाणात वापर करतेवेळी दर पंधरा दिवसांतून एकदा जीवनसत्त्व ‘अ' युक्त द्रावण तोंडावाटे द्यावं किंवा जीवनसत्त्व ‘अ' च इंजेक्शन द्यावं.
हिरव्या चाऱ्याच्या अभावामुळे जनावरांमध्ये जीवनसत्त्व ‘अ' ची कमतरता दिसून येते.
जनावरांच्या शरीरात नत्र व सल्फरची कमतरता असेल तर कोटीपोटातील पचनासाठी उपयुक्त जीवाणूंच्या क्रियाशीलतेला मर्यादा येतात त्यामुळे चाऱ्याचे पचन कमी होऊन जनावरं अशक्त होतात.
निकृष्ट चारा खाण्यास कठीण, तंतुमय पदार्थाचं प्रमाण जास्त असलेला तसच प्रथिनांच प्रमाण अतिशय कमी असणारा चारा असतो.