Lumpy Skin Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Skin : मराठवाड्यात ‘लम्पी स्कीन’मुळे 82 जनावरांचा मृत्यू

औरंगाबादमध्ये सर्वाधिक 36 जनावरे मृत्युमुखी

टीम ॲग्रोवन

औरंगाबाद : मराठवाड्यात शुक्रवारपर्यंत (ता. 30) लम्पी आजाराने (Lumpy Skin Disease) सात जिल्ह्यात 82 जनावरांचा मृत्यू झाला आहे. झपाट्याने वाढत असलेली जनावरांची मृत्यू (Cattle Death) संख्या मराठवाड्यात लम्पीचा विळखा घट्ट होत असल्याचे स्पष्ट करीत आहे.

माहितीनुसार मराठवाड्यात, लातूरमध्ये 13, औरंगाबाद 36, बीड 3, उस्मानाबाद 4, जालना जिल्हयात 12, नांदेड 13, हिंगोली 1 जनावरांचा मृत्यू झालेल्यांमध्ये समावेश आहे. राज्यात जवळपास 1436 पशुधनाचा मृत्यू झाला आहे. पशुपालकांनी भीती बाळगण्याचे कारण नसले तरी

त्यांनी आवश्यक खबरदारी घ्यावी. बहुतांश मृत्यू हे संबंधित आजारी पशुधनावर तीन ते चार दिवसांपेक्षा अधिक कालावधी लोटल्यानंतर उपचारास सुरुवात झाल्यामुळे झाले आहेत. रोगाचा उपचार लक्षणे दिसल्यानंतर वेळेत उपचार सुरू झाल्यास, मृत्यूची शक्यता अत्यंत कमी आहे.

बहुतांश पशु उपचाराला चांगला प्रतिसाद देत आहेत. सर्व पशुपालकांनी लम्पी आजारांच्या संभाव्य लक्षणांकडे बारकाईने लक्ष ठेवावे व त्वरित नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा. या बाबत सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. त्याचाही लाभ घेण्याची सूचना पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance : पिक विमा योजनेतील बदलांमुळे शेतकऱ्यांना फायदा होईल; केंद्रीय कृषिमंत्री चौहान यांचा दावा

Sugarcane Farming Crisis: तेलंगणात ऊस शेती संकटात, पीक क्षेत्र १० लाखांवरून ३५ हजार एकरावर, शेतकरी भात पिकाकडे वळले

Sports Legacy: येथे घडतात कबड्डीपटू...

Panchayati Raj: ग्राम विकासामध्ये ‘फीडर केडर’ आवश्‍यक

Natural Farming: नैसर्गिक शेतीसमोरील वास्तविक आव्हाने

SCROLL FOR NEXT