Lumpy skin disease Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Skin : ‘लम्पी’चा प्रसार रोखण्यासाठी पशुपालकांमध्ये जनजागृती करावी

Lumpy Skin Disease : पंढरपूर तालुक्यात सध्या काही भागात गोवंशीय जनावरांमध्ये लम्पी आजाराचा संसर्ग वाढत असून, पशुपालकांनी याबाबत वेळीच काळजी घ्यावी.

Team Agrowon

Solpaur News : पंढरपूर तालुक्यात सध्या काही भागात गोवंशीय जनावरांमध्ये लम्पी आजाराचा संसर्ग वाढत असून, पशुपालकांनी याबाबत वेळीच काळजी घ्यावी. तसेच आजाराचे प्राथमिक लक्षणे ,त्यावर करावयाच्या उपायोजना याबाबत पशुसंवर्धन विभागाने पशुपालकांमध्ये जनजागृती करावी. व्यापक जनजागृतीसाठी सामाजिक माध्यमांचाही वापर करावा, अशा सूचना तहसीलदार सुशिल बेल्हेकर यांनी शनिवारी (ता.२६) दिल्या.

पंचायत समिती पंढरपूर येथे लम्पी रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व करावयाच्या उपाययोजनांबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस गटविकास अधिकारी प्रशांत काळे, सहायक पशुसंवर्धन आयुक्त डॉ. एस.एस भिंगारे, पशुसंवर्धन विकास अधिकारी डॉ. प्रियंका जाधव उपस्थित होते. तालुक्यातील पशुवैद्यकीय अधिकारी, गावचे सरपंच, ग्रामसेवक यांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहनही बेल्हेकर यांनी यावेळी केले.

वेळीच उपचार, हाच उपाय

पंढरपूर तालुक्यात गोवंशीय जनावरे ९१ हजार तर म्हैसवगीय जनावरे ८९ हजार असे एकूण १ लाख ८० हजार जनावरे असून सद्यस्थितीत ६२ गोवंशीय जनावरे लम्पी आजाराने बाधित आहेत. बाधित जनावरे इतर निरोगी जनावरांपासून वेगळी करावीत.

लम्पीची लक्षणे आढळून आल्यास तात्काळ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना कळवावे, वेळीच जनावरांवर उपचार करून घ्यावेत. बाधित व निरोगी जनावरे एकत्रित चरावयास सोडू नये, जनावरांच्या संपर्कात आलेल्या साहित्याचे निर्जंतुकीकरण करावे, असे पशुसंवर्धन विकास अधिकारी डॉ. प्रियंका जाधव यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Alert: राज्यात १० जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट; दोन दिवस पावसाचा अंदाज

Gokrupa Amrut Production: जालना जिल्ह्यात २ लाख ५८ हजार लिटर ‘गोकृपा अमृत’ निर्मिती

American Armyworm: ३ उपायांनी करा मक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचे नियंत्रण

Chilli Crop Management: मिरची पिकात वाढवर्धकांचा अनावश्यक वापर टाळा : डॉ. संजय पाटील

Sheep Grazing Permission: मेंढपाळांसाठी सरकारचा महत्त्वाचा निर्णय, २१ वन विभागांमध्ये मेंढी चराईसाठी परवानगी

SCROLL FOR NEXT