Animal Vaccination Agrowon
काळजी पशुधनाची

Animal Vaccination : जनावरांचे वेळच्यावेळी लसीकरण होणे गरजेचे

लसीकरण न करून घेतल्यामुळे लाळ-खुरकूत, घटसर्प, फऱ्या, आंत्रविषार, शेळयातील प्लेग, ब्रुसेलोसिस, गोचिड ताप इ. आजारामुळे जनावरे आजारी पडतात.

Team Agrowon

सध्या लंपी स्किन (Lumpy Skin) रोगाचा प्रादुर्भावामुळे बऱ्याच पशुपालकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. लसीकरण न केल्यामुळे या रोगामुळे जनावरे दगावण्याचे प्रमाण वाढले. अशा घातक आजारापासून जनावरांचे संरक्षण होण्यासाठी जनारांचे वेळापत्रकानूसार लसीकरणे होणे गरजेचे आहे. जनावरे आजारी पडल्यामुळे दूध उत्पादनात घट, गर्भपात, दोन वेतातील अंतर वाढणे, वासरांची वाढ कमी होणे, इतर आजारांचा प्रादुर्भाव  वाढतो. हे लक्षात घेऊन शिफारशीनुसार लसीकरण आवश्यक आहे. लसीकरण न करून घेतल्यामुळे लाळ-खुरकूत, घटसर्प, फऱ्या, आंत्रविषार, शेळयातील प्लेग, ब्रुसेलोसिस, गोचिड ताप इ. आजारामुळे जनावरे आजारी पडतात. 

- दरवर्षी बऱ्याच ठिकाणी लाळ्या खुरकूत आजाराचा गायी, म्हशींना प्रादुर्भाव  दिसून येतो. या प्रादुर्भावामुळे केवळ प्रत्यक्ष जनावर दगावून नुकसान होत नाही तर अनेक अप्रत्यक्ष घटकांमुळे आर्थिक नुकसान होत असते. मरतुकीमुळे प्रत्यक्षपणे आर्थिक नुकसान होते. 

- जनावरे आजारी पडल्यामुळे दूध उत्पादनात घट, गर्भपात, औषधोपचार, दोन वेतातील अंतर वाढणे, वासरांची वाढ कमी होणे, इतर आजारांचा प्रादुर्भाव  वाढतो. 

- लाळ्या खुरकूत झाल्यामुळे दूध उत्पादनात घट होऊन होणारे आर्थिक नुकसान हे ६० ते ६८ टक्के होते.  याच्या प्रादुर्भावामुळे आपल्याकडील उत्पादित मांस व दूध यांना प्रगत देशात अत्यल्प मागणी आहे. यामुळे आपल्या उत्पादनांना मोठी बाजारपेठ मिळत नाही आणि अप्रत्यक्षपणे आपले नुकसान होते. 

- जनावरांना  लसीकरण न केल्यामुळे होणाऱ्या आजारांचा मानवी आरोग्यावरही काही प्रमाणात अपाय होत असतो. 

- सध्याच्या काळात जनावरांना लसीकरण करून घेण्याची वेळ आहे. तरी आपल्या जनावरांना लसीकरण करून घ्यावे. परिणामकारक लसीकरण मोहिमेसाठी मास लसीकरण ही संकल्पना राबविणे गरजेचे आहे.  मास लसीकरण म्हणजे एका गावातील, वस्तीवरील सर्व जनावरांचे  एकावेळी/ एकादिवशी लसीकरण करणे. यामुळे  प्रसारास आळा बसून आजाराचे उच्चाटन होण्यास निश्चीत मदत होईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

E Crop Registration: अमरावतीत ७९ टक्के शेतकऱ्यांचा ऑनलाइन पीक पेऱ्याला खो

Jal Jeevan Mission: जलजीवन योजनेचे काम रखडल्याने टंचाईच्या झळा

Pesticide Company Inspection: ‘ड’ वर्गातील कीडनाशक कंपन्या रडारवर

LPG Cylinder Crisis: एलपीजी सिलिंडरमधून मिळणार केवळ १० किलो गॅस

Milk Adulteration MCOCA Action: दूध भेसळखोरांवर ‘मकोका’चा बडगा

SCROLL FOR NEXT