शेळ्यांचे उन्हाळ्यात व्यवस्थापन कसे करावे? Agrowon
काळजी पशुधनाची

शेळ्यांचे अर्धबंदिस्त पद्धतीने व्यवस्थापन फायदेशीर

ज्या शेतकऱ्यांना पूर्ण बंदिस्त पद्धतीने शेळीपालन करणे परवडत नाही किंवा मोकाट शेळीपालनासाठी कुरणे नसल्यास अशा शेतकऱ्यांसाठी अर्धबंदिस्त शेळीपालन फायदेशीर ठरते.

Team Agrowon

ज्या शेतकऱ्यांना पूर्ण बंदिस्त पद्धतीने (intensive method) शेळीपालन करणे परवडत नाही किंवा मोकाट शेळीपालनासाठी (goat farming) कुरणे नसल्यास अशा शेतकऱ्यांसाठी अर्धबंदिस्त शेळीपालन फायदेशीर ठरते. शेळ्यांचे व्यवस्थापन मिश्र म्हणजे अर्धबंदिस्त पद्धतीने करताना, काही वेळ मुक्त आणि काही वेळ बंदिस्त पद्धतीचा अवलंब केला जातो. या पद्धतीला अर्धबंदिस्त शेळीपालन म्हंटले जाते.

शेळ्यांना पूर्ण वेळ शेड मध्ये बांधून ठेवल्यास, व्यवस्थापनावर अतिरिक्त खर्च होत असतो. याउलट पूर्ण वेळ चरायला सोडण्यासाठी कुरणांचे कमी झालेलं क्षेत्र या अडचणी येतात. यावर पर्याय म्हणून अर्धबंदिस्त शेळीपालनाची पद्धत पुढे आली.

शेळी हा फिरून स्वतःचे खाद्य स्वतः मिळवून खाणारा प्राणी आहे. शेळ्या फिरत असताना विविध प्रकारचा चारा, झाडांचा पाला खात असतात. आहारात औषधी वनस्पतीचा समावेश झाल्याने त्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. शेळ्यांना नैसर्गिकपणे झाडांचा पाला ओरबाडून खाण्याची सवय असते. शेडमध्ये सतत बांधून ठेवल्यास, त्यांच्या शरीराचा योग्य व्यायाम होतो. खुरांची अतिरिक्त वाढ होत नाही.

या पद्धतीमध्ये शेळ्यांना बांधावरचे कुरण, पिकांची काढणी केलेल्या जागी, दिवसातील ६ ते ८ तास चरण्यासाठी सोडले जाते. परंतु फक्त नैसर्गिक चाऱ्यावर शेळ्यांचे पूर्ण पोषण होत नाही. हे लक्षात घेऊन, रात्रीच्या वेळी गोठ्यात त्यांना कोरडा, हिरवा चारा आणि पशुखाद्य दिले जाते. क्षार मिश्रणांची वीट गोठ्यात टांगून ठेवली जाते.

या पद्धतीमध्ये शेळ्यांच्या कळपाचे स्थलांतर केले जात नाही. या पद्धतीने शेळ्यांचे संगोपन करताना शेळ्यांच्या कळपाचे आकारमान लहान असते. गाभण शेळ्या, करडांची विशेष काळजी घ्यावी लागते. योग्य व्यवस्थापन केल्याने, शरीर वाढीचा वेग, प्रजनन क्षमता चांगली राहण्यास मदत होते.

अर्धबंदिस्त शेळीपालनाचे फायदे-

बाहेरचा झाडपाला खाल्ल्यामुळे खाण्याच्या खर्चात बचत होऊन, विविध प्रकारचा चारा शेळ्यांच्या पोटात जातो.

शेळ्यांचा चांगला व्यायाम होऊन, आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.

अर्धबंदिस्त शेळीपालनाचे तोटे

चरत असताना, निरोगी शेळ्या रोगाने बाधित इतर शेळ्यांच्या संपर्कात आल्याने रोगाचा प्रादुर्भाव होतो. शेळ्यांनी खाल्लेल्या एकूण आहाराचे मोजमाप करता येत नाही.

पुर्णपणे मोकाट किंवा अर्धबंदिस्त पद्धतीने शेळी पालन करण्यासाठी कुरणांची, चराऊ क्षेत्राची गरज असते. सध्या कुरणांचे कमी होत चालले क्षेत्र ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे पुढील काळाचा विचार करता बंदिस्त शेळीपालन पद्धतच अधिक व्यवहार्य ठरणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Supply Schemes Issue: निधीअभावी जलजीवन मिशनच्या ६८ पाणीपुरवठा योजना रखडल्या

Cotton Farming Techniques: हेक्टरी १२ ते १४ क्विंटल कापूस उत्पादनाचे उद्दिष्ट; शास्त्रीय तंत्रज्ञानाचा अवलंब करा

Farmer Loan Waiver: नांदेडमध्ये एक लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्ती

PM Kisan 24th Installment: शेतकऱ्यांना दिवाळीआधी २ हजार मिळणार; 'पीएम किसान'च्या २४ व्या हप्त्याची अधिकृत तारीख जाहीर

Food Conservation: अन्नाची बचत हीच अन्ननिर्मिती; अन्न-पाण्याची नासाडी टाळा : डॉ. इंद्र मणी मिश्रा

SCROLL FOR NEXT