Lumpy Skin Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Skin : ‘लम्पी’च्या विषाणूचा वेगळा व्हेरिएंट?

Lumpy Skin Disease : लसीकरण करूनही ‘लम्पी स्कीन’चा विषाणू नियंत्रणात येत नसल्याने नवीन ‘व्हेरिएंट’ तयार झाला आहे का? यावर संशोधन सुरू आहे.

गणेश कोरे

Pune News : लसीकरण करूनही ‘लम्पी स्कीन’चा विषाणू नियंत्रणात येत नसल्याने नवीन ‘व्हेरिएंट’ तयार झाला आहे का? यावर संशोधन सुरू आहे. दरम्यान, गेल्या आठ दिवसांत राज्यात लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव दुपटीने वाढला आहे.

सोमवार (ता.२८) अखेर राज्यात १२ हजार २७४ गोवर्गीय पशुधन बाधित आहे, तर ३६५७ जनावरे मृत्यूमुखी पडली आहेत. यात केवळ आठ दिवसांत १ हजार १४४ जनावरांचा समावेश असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाने दिली आहे.

राज्यात गेल्या चार महिन्यांपासून लम्पी स्कीन आजार वेगाने फैलावत आहे. ‘लम्पी’चा प्रसार होऊ नये म्हणून पशुसंवर्धन विभागाने युद्धपातळीवर लसीकरण हाती घेतले आहे. सोमवार (ता.२८) अखेर राज्यातील १ कोटी ३९ लाख ९२ हजार गोवर्गीय पशुधनापैकी १ कोटी ३४ लाख ४० हजार जनावरांचे (९६ टक्के) लसीकरण करण्यात आले.

मात्र गेल्यावर्षी आणि यंदा असे दोन्ही वर्षी लसीकरण करून देखील ‘लम्पी’च्या विषाणूवर नियंत्रण मिळविण्यात यश आले नसल्याचे समोर आले आहे. ‘लम्पी’च्या विषाणूलाही लस रोखू शकत नसल्याने नवीन ‘व्हेरिएंट’ तयार झाल्याची शक्यता पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे. नव्या व्हेरिएंटवर केंद्र सरकार आणि राज्यातील पशुवैद्यकीय महाविद्यालयातील तज्ज्ञांनी संशोधन सुरू केले असल्याचे पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात आले.

चारा छावण्यांवर ‘लम्पी’चे सावट

राज्यात दुष्काळी परिस्थिती असून, विविध जिल्ह्यांमध्ये चारा छावण्या सुरू करण्याचे नियोजन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. विविध गावांतील पशुधन एकत्र आणून ठेवण्यात येणार असल्याने चारा छावण्यांवर ‘लम्पी’चे सावट आहे. चारा छावण्या उभारताना लसीकरण करण्याबरोबरच आजारी आणि दुधाळ पशुधनाची काळजी घ्यावी लागणार आहे.

‘लम्पी’च्या वेगळ्या व्हेरिएंटवर संशोधन

केंद्र सरकार तसेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी (एनआयव्ही) येथील तज्ज्ञांच्या सूचनेनुसार ‘लम्पी स्कीन’वरील लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात गाभण जनावरे आणि छोटी वासरे यांना वगळण्यात आले होते. त्यामुळे सध्याचा प्रादुर्भाव हा याच वयोगटातील जनावरांमध्ये जास्त आहे.

त्यासाठी पुन्हा लसीकरण सुरू केले आहे. प्रादुर्भावाचा आढावा घेण्यासाठी नागपूर, शिरवळ आणि मुंबई येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयांमधील तज्ज्ञांना प्रक्षेत्रावर पाठविण्यात आले आहे. त्याचबरोबर केंद्र सरकारचे अधिकारी देखील प्रक्षेत्रावर आले असून विषाणूचा नवीन प्रकार आढळला आहे का? याची चाचपणी करत असल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली आहे.

योग्य माहिती समोर येईल...

‘लम्पी’चा वेगळा व्हेरिएंट आला आहे का ? याच्या अभ्यासासाठी तयार करण्यात आलेल्या गटातील पशूतज्ज्ञाने सांगितले की, आम्ही राज्यातील विविध विभागातील लम्पी स्कीन बाधित गोवर्गीय पशुधनाच्या रक्ताचे नमुने ‘एनआयव्ही‘मध्ये पाठविले आहेत. तेथील तज्ज्ञांकडून नमुने तपासणीनंतर व्हेरिएंट बाबत योग्य माहिती समोर येईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

livestock Vaccination: पशुवैद्यक महाविद्यालयातर्फे इटलापूर येथे पशुधनाचे लसीकरण

Mahareshim Abhiyan: हिंगोलीत महारेशीम अभियानात १२० शेतकऱ्यांची नोंदणी

Watermelon Disease Control: अवकाळीनंतर कलिंगडावर रोगांचा धोका! कसे करावे नियंत्रण?

Sugarcane Production Drops: ऊस पिकाच्या उत्पादनात मोठी घट

Krushi Kumbh Exhibition: ‘कृषी कुंभ’ प्रदर्शनाचे आयोजन नेटके,मात्र शासकीय यंत्रणांची उदासीनता

SCROLL FOR NEXT