Junnar News Agrowon
काळजी पशुधनाची

Junnar News: पिंपरी पेंढारला अपघातात ९ म्हशींचा मृत्यू

मुंबई येथून कल्याण नगर महामार्गाने म्हशी घेऊन जाणारा टेंपो पिंपरी पेंढार गावच्या हद्दीतील साईनगर येथील वळणावर आला असता चालकाचा टेंपोवरील ताबा सुटल्याने तो रस्त्याच्या लगत असलेल्या खड्यात जाऊन पलटी झाला.

Team Agrowon

पिंपळवंडी (ता.जुन्नर) - नगर कल्याण महामार्गावर पिंपरी पेंढार(ता.जुन्नर) येथे म्हशी घेऊन जाणारा टेंपो पलटी झाल्याने आठ म्हशी मुत्यूमुखी (Buffalo Died) पडल्या असुन चालकासह दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी(ता.१०) पहाटेच्या सुमारास घडली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मुंबई येथून कल्याण नगर महामार्गाने म्हशी घेऊन जाणारा टेंपो पिंपरी पेंढार गावच्या हद्दीतील साईनगर येथील वळणावर आला असता चालकाचा टेंपोवरील ताबा सुटल्याने तो रस्त्याच्या लगत असलेल्या खड्यात जाऊन पलटी झाला.

या दुर्घटनेत टेम्पोत भरलेल्या दहा म्हशींपैकी आठ म्हशींचा जागीच मृत्यू झाला तर चालक व आणखी एकजण जखमी झाल्याची माहिती ओतुर पोलिसांनी दिली.

स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने दोन्ही जखमींना आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

अपघाताची माहिती मिळताच ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार दत्ता तळपाडे, संदीप भोते, शाम जायभाय, अमोल पालवे घटनास्थळी हजर झाले व परिस्थिती नियंत्रणात आणली.

दरम्यान पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मंगेश खिल्लारी व डॉ. कैलास लुधरकर यांनी म्हशींची तपासणी करून आठ म्हशी मृत असल्याचे घोषित केले.तर दोन म्हशी गंभीर जखमी आहेत. याबाबत पुढील तपास ओतुर पोलीस करत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Family Compensation: आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना तातडीने मदत; २५ कोटी मंजूर

Fake Fertilizer Sale: भोकरमध्ये बनावट खत विक्रीचा पर्दाफाश

Heavy Rainfall Impact: वादळाचा वीज महावितरणला झटका

Fertilizer Supply Issue: मंजूर साठ्यापेक्षा ४ हजार ४२८ टन कमी खताचा पुरवठा

Kharif Season Preparation: खरीप हंगामासाठी गावोगावी तयारीला वेग

SCROLL FOR NEXT