Lumpy Skin  Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Skin : लम्पी स्कीन ’मुळे बीड जिल्ह्यात ८४ जनावरांचा मृत्यू

गोवंशीय जनावरांमधील लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव बीड जिल्ह्यात वाढत आहे. या आजाराचा फैलाव जिल्हाभरात असून आतापर्यंत ८४ जनावरांचा ‘लम्पी’ या साथीच्या आजाराने मृत्यू झाला आहे.

टीम ॲग्रोवन

बीड : गोवंशीय जनावरांमधील लम्पी स्कीन (Lumpy Skin) आजाराचा प्रादुर्भाव बीड जिल्ह्यात वाढत आहे. या आजाराचा फैलाव जिल्हाभरात असून आतापर्यंत ८४ जनावरांचा ‘लम्पी’ या साथीच्या आजाराने (Lumpy Skin Disease) मृत्यू झाला आहे. ‘लम्पी स्कीन’मुळे मृत्यू (Animal Died) झालेल्या ३१ जनावरांच्या ३० मालकांना सानुग्रह अनुदानाचे वितरण करण्यात आले आहे. ५३ जनावरांच्या मालकांना सानुग्रह अनुदानाचा प्रस्ताव शासनाकडे पशुसंवर्धन विभागाने पाठविला आहे.

जिल्ह्यातील आतापर्यंत १८४ गावांमध्ये २३८१ गोवंशीय जनावरांना लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव झाला आहे. यात उपचारानंतर १३३५ जनावरे बरी झाली असून अद्यापही ११६३ जनावरे साथीच्या विळख्यात आहेत. यातील ६८ जनावरे गंभीर आजारी आहेत. प्रशासनाने सुरवातीपासून या आजाराचा फैलाव रोखण्यासाठी लसीकरण, जनावरांचे बाजार बंद, वाहतूक बंद अशा उपाययोजना हाती घेतल्या.

जिल्ह्यात सर्व चार लाख ९६ हजारांहून अधिक गोवंशीय जनावरांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. शासनाच्या व जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागांसह खासगी पशुवैद्यकांच्या मदतीने लसीकरण करण्यात आले आहे. अद्यापही पशुसंवर्धन विभागाकडे सात हजारांहून अधिक लसींच्या मात्रा शिल्लक आहेत. दरम्यान, जिल्ह्यात या आजाराने ८४ जनावरे दगावली असून ३१ जनावरांसाठी मदत देण्यात आल्याची माहिती, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विजय देशमुख यांनी दिली.

चेकनाके उभारण्याचे निर्देश दरम्यान, जिल्ह्यात जनावरांमधील लम्पी स्कीन आजार हा लाळीतून होणारा संसर्गजन्य आजार आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी सुरुवातीपासूनच जिल्ह्यातील जनावरांचे बाजार बंदचे आदेश दिले होते. मात्र, जिल्ह्यातून परजिल्ह्यात व परराज्यात तर बाहेर जिल्हा व राज्यातून देखील जिल्ह्यात जनावरे टेम्पो, कंटेनरच्या माध्यमातून आणली जात असल्याचे आढळले आहे.

त्यामुळे जिल्ह्यात येणाऱ्या रस्त्यांवर चेकनाके उभारण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर दिले आहेत. याबाबत पालकमंत्री अतुल सावे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत प्रशासनाला तशा सूचना केल्या होत्या. जिल्ह्याच्या सीमेवर जनावरांच्या वाहतुकीवर बंदीची प्रभावी अंमलबजावणी करावी, असेही या निर्देशात म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

India Electricity Demand : उष्णतेच्या लाटामुळे विजेची मागणी वाढली; वीज उत्पादन १६७.६१ अब्ज किलोवॅट तासांवर पोहचले

Dairy Business: शेटे कुटुंबाने साधली दूध व्यवसायातून भरभराट

Sugarcane Policy: साखर उद्योग कायद्याच्या निर्णायक टप्प्यावर

India Election Result: बदलाला कौल

Melghat Wildlife Census: अंबाबरवा अभयारण्यात नऊ वाघांसह तीन बिबटे

SCROLL FOR NEXT