Lumpy Skin Disease Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Skin : रत्नागिरी जिल्ह्यात ‘लम्पी’मुळे ६८ गुरांचा मृत्यू

Lumpy Skin Latest Update : सर्वाधिक बाधित राजापूर, लांजा आणि रत्नागिरी या तीन तालुक्यांत असून लम्पी स्कीनमुळे आतापर्यंत ६८ जनावरांचा मृत्यू झाला आहे.

Team Agrowon

Ratnagiri News : जिल्ह्यात लम्पीचा प्रादुर्भाव वाढला असून ५ तालुक्यांमधील १३८ गावांतील ६०६ जनावरांना लागण झाली आहे. सर्वाधिक बाधित राजापूर, लांजा आणि रत्नागिरी या तीन तालुक्यांत असून लम्पी स्कीनमुळे आतापर्यंत ६८ जनावरांचा मृत्यू झाला आहे. १७८ जनावरे उपचारानंतर बरी झाली असून ३६० उपचाराखाली आहेत.

राज्यभरात लम्पीमुळे बाधित जनावरांची संख्या दिवसेंदिवस वाढत आले. मागील चार महिन्यांत ‘लम्पी’चा रत्नागिरी जिल्ह्यातील प्रादुर्भाव वाढत आहे. लम्पी नियंत्रणासाठी पशुसंवर्धन विभागाकडून लसीकरण मोहीम आखण्यात आली आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यातील २ लाख ६६ हजारांपैकी २ लाख ३५ हजार जनावरांना लस देण्यात आली आहे. रत्नागिरी, लांजा, राजापूर या तालुक्यांत सर्वाधिक जनावरे बाधित झालेली आहे.

या तिन तालुक्यात लम्पी पसरण्यामागील कारण पशुसंवर्धन विभागाकडून शोधण्यात आले. मागील महिन्यांमध्ये जिल्ह्यात चिखलणी, नांगरणी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये काही परजिल्ह्यातील जनावरांचा सहभाग होता. राज्यभरात सगळीकडेच लम्पीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात सरू आहे. त्या स्पर्धांमधून कदाचित लम्पीचा प्रादुर्भाव झाला असावा अशी शक्यता जिल्हा पशुसंवर्धन विभागाने वर्तविला आहे.

याबाबतचा अहवाल जिल्हा प्रशासनाला देण्यात आला असून जनावरे एकत्रित येणाऱ्या‍ स्पर्धा किंवा या प्रकारचे नियोजन करू नये असे आवाहन पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आले आहे. रत्नागिरी शहर आणि आजूबाजूच्या ग्रामीण भागात लम्पीग्रस्त मोकाट जनावरे रस्त्यावरून हिंडताना दिसत आहेत. त्या जनावरांकडून अन्य जनावरांना लागण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मंगळवारी (ता. १९) दुपारी कसोप ते भाट्ये दरम्यान गुरांचा कळप रस्त्यावरून फिरत होता.

त्यातील एका जनावराच्या अंगावर जखमा झालेल्या होत्या. ते जनावर लम्पीसदृश असण्याचीही शक्यता आहे. अशा जनावरांबाबत प्रशासनाकडून गांभिर्याने भूमिका घ्यावी अशी मागणी होत आहे. दरम्यान, लम्पीला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून काही दिवसांपूर्वी आढावा घेण्यात आला होता. त्यावेळी रस्त्यावर फिरणाऱ्या जनावरांच्या मालकांवर कारवाई करावी, असे आदेशही दिले होते.

मागील महिन्याभरामध्ये लम्पी बाधित जनावरांची तालुकानिहाय आकडेवारी अशी

तालुका बाधित गावे बाधित जनावरे मृत जनावरे बरी झालेली

राजापूर ५४ ९३ ० २६

लांजा २४ १९४ ८ ३७

रत्नागिरी ३६ २७१ ७ ११२

संगमेश्वर १० ३२ १ ०

दापोली १४ १६ १ ३

बाधित जनावरे एकत्र येणार नाहीत, यादृष्टीने ग्रामपंचायतस्तरावर सूचना देण्यात आलेल्या आहेत. मागील महिन्यात काही ठिकाणी परजिल्ह्यांतील जनावरे स्पर्धांच्या निमित्ताने आली होती. त्यांच्या संपर्कामधून लम्पीचा प्रादुर्भाव वाढल्याची शक्यता आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाला अहवाल सादर केला आहे.
- डॉ. आर. पी. नरुटे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Scheme : लाडकी बहिण योजनेचा जिल्हा परिषदेच्या १ हजार १८३ कर्मचाऱ्यांनी घेतला लाभ; प्रकरण आले उघडकीस

Rain Crop Damage : सततच्या पावसामुळे मुगाच्या शेंगांना फुटले कोंब

Sindhudurg Rainfall : सिंधुदुर्गाला पुराचा तडाखा; जनजीवन विस्कळीत

Sangli Water Storage : सांगलीतील प्रकल्पांत ७३ टक्के पाणीसाठा

Sangli Rainfall : दुष्काळी भागातील पिकांना पाऊस ठरतोय उपयुक्त

SCROLL FOR NEXT