Lumpy Skin
Lumpy Skin  Agrowon
काळजी पशुधनाची

lumpy Skin : लम्पी स्कीन’मुळे ५५ जनावरे दगावली

टीम अॅग्रोवन.

परभणी ः परभणी जिल्ह्यत लम्पी स्कीन (lumpy Skin Disease) आजाराचा संसर्ग संथ गतीने वाढत आहे. शनिवार (ता. ५) पर्यंत सर्व ९ तालुक्यांतील ११६ गावांतील १ हजार २३५ जनावरांना (Animals) लम्पी स्कीन आजारामुळे बाधित झाली आहेत. उपचारानंतर या आजारातून ४७३ जनावरे बरी झाली आहेत. ‘लम्पी स्कीन’मुळे जिल्ह्यातील एकूण ५५ जनावरे दगावली (Animal Died Due To Lumpy Skin Infection) असून, त्यात वासरांची संख्या २७ आहे, तसेच १९ बैल आणि ९ गायींचा समावेश आहे.

एकूण २ लाख ८७ हजार ९२७ जनावरांचे (९६.०६ टक्के) लसीकरण पूर्ण झाले आहे, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. पी. पी. नेमाडे यांनी दिली.या आजाराचा प्रसार टाळण्यासाठी तत्काळ लसीकरण करावयाच्या एकूण गोवर्गीय जनावरांची संख्या २ लाख ४३ हजार ३५३ आहे.

त्यात गायी १ लाख १२ हजार ४३७ तर बैल १ लाख ३० हजार ९१६ आहेत. आजवर २ लाख ९४ हजार ३० लस मात्रा प्राप्त झाल्या आहेत. जिल्ह्यातील लसीकरण करावयाच्या एकूण गोवंशीय जनावरांची संख्या २ लाख ९९ हजार ८६१ आहे. त्यात १ लाख ३७ हजार १५० गायी आणि १ लाख ६२ हजार ७११ बैलांचा समावेश आहे. प्रत्यक्षात २ लाख २८ हजार ११३ जनावरांचे लसीकरण झाले आहे.

त्यात १ लाख ३ हजार ९५४ गायी आणि १ लाख २१ हजार ३३४ बैलांचा समावेश आहे. गोशाळेतील लसीकरण केलेल्या जनावरांची संख्या ३ हजार ९९५ एवढी आहे. गोवर्गात ५५ हजार ८१९ जनावरांचे स्वच्छ लसीरकरण करण्यात आले. एकूण २ लाख ८७ हजार ९२७ जनावरांचे (९६.०२ टक्के) लसीकरण झाले आहे. त्यात गायींची संख्या १ लाख ३४ हजार २५२, बैलांची संख्या १ लाख ५० हजार ८५०, म्हैस संख्या २ हजार ८४५ एवढी आहे. सध्या उपचार सुरू असलेल्यापैकी ४४ जनावरांची प्रकृती गंभीर आहे, असे डॉ. नेमाडे यांनी सांगितले.

जिल्हातील ‘लम्पी स्कीन’ प्रादुर्भावाची स्थिती अशी...

परभणी जिल्ह्यात गायींची संख्या १ लाख ३७ हजार १५०, बैलांची संख्या १ लाख ६२ हजार ७११ आणि म्हशींची संख्या ९८ हजार ४९५ एवढी आहे. लम्पी स्कीन आजाराचा संसर्ग जिल्ह्यातील ८४९ पैकी ११६ गावांतील १ हजार २३५ जनावरांना झाला आहे.

त्यात गायी ४६२ आणि ७७३ बैलांचा समावेश आहे. उपचारानंतर १७२ गायी आणि ३०१ बैल बरी झाले आहेत. सध्याच्या बाधित जनावरांची संख्या ७०७ आहे. बाधित गावांपासून ५ किलोमीटर परिघातील ५२९ गावांतील जनावरांची एकूण संख्या २ लाख ३७ हजार ७९२ एवढी आहे. त्यात गायीची संख्या ८१ हजार ५०९ आणि बैलांची संख्या ९५ हजार ६१ एवढी आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Sowing : महाराष्ट्रात कापसाचा पेरा राहणार ४२ लाख हेक्टरवर

Animal Heat Stress : वाढत्या उष्म्याचा पशुधनाला धोका

Agriculture Technology : शेती तंत्रज्ञान, पिकांबाबत शेतकरी साक्षर असणे गरजेचे

Ocean Weather : हिंद महासागरात कायमस्वरूपी सागरी उष्ण लाटांची शक्यता

Bajari Harvesting : उन्हाळी बाजरी काढणीच्या अवस्थेत

SCROLL FOR NEXT