lumpy Skin
lumpy Skin Agrowon
काळजी पशुधनाची

lumpy Skin : ‘लम्पी स्कीन’ मुळे ५० जनावरे दगावली

Team Agrowon

हिंगोली ः हिंगोली जिल्ह्यात बुधवार (ता. ९) पर्यंत ८७ गावांतील १ हजार ३५० जनावरांना लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव झाला आहे. उपचारानंतर ४०७ जनावरे बरी झाली आहेत. परंतु ५० जनावरांचा मृत्यू (Animal Died Due To Lumpy Skin) झाला आहे. सध्या ८९३ जनावरांवर उपचार सुरू असून, यातील ५७ जनावरे गंभीर आजारी आहेत, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन (Animal Husbandry) अधिकारी डॉ. आर. डी. कदम यांनी दिली.

जिल्ह्यात लम्पी स्कीन आजाराचा संसर्ग वाढत आहे. आजवर ८७ गावे बाधित क्षेत्र (ईपी सेंटर) जाहीर करण्यात आली आहेत. बाधित क्षेत्राच्या ५ किलोमीटर परिघातील गावांची संख्या ५६० आहे. या गावातील २ लाख १२ हजार ६५९ जनावरांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे.

आजवर बाधित क्षेत्रातील २ लाख १६ हजार ६३४ जनावरे आणि स्वच्छ क्षेत्रातील १९ हजार ९४० जनावरांचे मिळून एकूण २ लाख ३६ हजार ५७४ जनावरांचे लसीकरण करण्यात आले. जिल्ह्यातील सर्व ५ गोशाळांतील जनावरांचे लसीकरण करण्यात आले. जिल्ह्यात २ लाख ४१ हजार ८०० लसींचा पुरवठा झाला आहे.

राज्यातील अनेक जिल्ह्यांत लम्पी स्कीन आजाराचा शिरकाव झालेला असताना हिंगोली जिल्हा यापासून दूर होता. एकही बाधित जनावर आढळले नव्हते. पशुसंवर्धन विभागाने जिल्ह्यात लम्पी आजाराचा शिरकाव होण्यापूर्वीच जनजागृतीसह लसीकरण मोहीम हाती घेतली होती. मात्र लम्पीचा शिरकाव होताच बाधित जनावरांची संख्या वाढत गेली. या आजाराची लक्षणे आढळून आल्यास पशू वैद्यकीय अधिकाऱ्यास माहिती द्यावी.

गोठ्यात फवारणी करा...

बाधित जनावर वेगळे ठेवावे. चारा-पाण्याची व्यवस्था स्वतंत्र करावी. लम्पी स्कीन बाधित गोठा सोडियम हायपोक्लोराइडने फवारून घ्यावा. गोचिड, पिसवा, माशांचा नायनाट करण्यासाठी सायपरमेथरीन किंवा डेल्टामेथरीनची फवारणी नियमित करावी, असे आवाहन पशुसंवर्धन विभागातर्फे करण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Update : गुणवत्तापूर्ण बियाणे, खते शेतकऱ्यांना द्या : इटनकर

Summer Weather : परभणीत दिवसाचा पारा ४३ अंशांवर

Water Stock : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

Flower Rate : लग्नसराईमुळे फुलांच्या दरांत वाढ

Anandacha Shidha : आनंदाच्या शिध्याची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT