Lumpy Skin Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Skin : नांदेडमध्ये ४८ जनावरांचा लम्पी स्कीनमुळे मृत्यू

जिल्ह्यात लम्पी स्कीन आजारामुळे आत्तापर्यंत ४८ जनावरांचा मृत्यू झाला आहे. तर एक हजार १३१ गायवर्ग पशुधनाला लम्पीची बाधा झाली आहे.

टीम ॲग्रोवन

नांदेड : जिल्ह्यात लम्पी स्कीन आजारामुळे (Lumpy Skin Disease) आत्तापर्यंत ४८ जनावरांचा मृत्यू झाला आहे. तर एक हजार १३१ गायवर्ग पशुधनाला लम्पीची बाधा झाली आहे. आजच्या घडीला जिल्ह्यातील चार लाख १२ हजार ५३५ पशुधनाचे लसीकरण (Lumpy Vaccination) पूर्ण झाले आहे. मयत २० जनावराच्या पशुपालकांना अर्थसाहाय्य देण्यात आल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. मधुसूदन रत्नपारखी (Dr. Madhusudan Ratnaparkhe) यांनी दिली.

आजच्या घडीला नांदेड जिल्ह्यातील १२२ गावे लम्पी बाधित आहेत. या १२२ गावातील ५२ हजार १०१ जनावरांपैकी बाधित एक हजार १३१ बाधित पशुधनाला वेगळे काढून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. तर ४५ जनावरांचा या आजाराने मृत्यू झाला आहे.

बाधित गावाच्या पाच किलोमीटर परिघातील गावांची संख्या ६०९ आहे. यामुळे बाधित गावे ७३१ झाली आहेत. या बाधित १२२ गावांच्या पाच किलोमीटर परिघातील ७३१ गावातील (बाधित १२२ गावांसह) एकूण पशुधन संख्या एक लाख ९० हजार ८२२ आहे.

पशुपालकांनी घाबरून न जाता आपल्या पशूची स्वच्छता, गोठ्यातील स्वच्छता व पशुवैद्यकीय अधिकारी यांनी सांगितल्याप्रमाणे काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Protest: सक्तीच्या वसुली विरोधात शेतात फडकवले काळे झेंडे

Kalmana APMC: कळमना ‘एपीएमसी’ची ‘एसआयटी’ चौकशी अवैध

Heavy Rain: परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील अतिवृष्टीने पिके मातीमोल

Gold Silver Rate: सोने-चांदी दरात वाढीचा कल

Sugar Recovery Theft: इथेनॉलच्या नावाखाली उतारा चोरीचा संशय

SCROLL FOR NEXT