Lumpy Skin Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Skin Disease : सोलापुरात लम्पी स्कीनने पुन्हा ४३ जनावरे बाधित

Lumpy Skin : जिल्ह्यात सध्या लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव आटोक्यात असला, तरीही जिल्ह्यात आतापर्यंत ७४० जनावरे लम्पी बाधित झाली आहेत. त्यात सर्वाधिक २२७ जनावरे मंगळवेढा तालुक्यातील आहेत.

Team Agrowon

Solapur News : जिल्ह्यात सध्या लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव (Lumpy Skin Disease) आटोक्यात असला, तरीही जिल्ह्यात आतापर्यंत ७४० जनावरे लम्पी बाधित झाली आहेत. त्यात सर्वाधिक २२७ जनावरे मंगळवेढा तालुक्यातील आहेत. गेल्या दोन दिवसांत त्यात पुन्हा वाढ झाली असून, या दोन दिवसांत सर्वाधिक ४३ जनावरांना लम्पी स्कीनची बाधा झाली असल्याचे आढळले आहे.

जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने लम्पी स्कीनग्रस्त जनावरांच्या संख्येत चढ-उतार होतो आहे. पण एकूणच परिस्थिती पाहता, जिल्ह्यातील बहुतेक सर्व तालुक्यात ही संख्या असली, तरी काही ठरावीक भागातच ही जनावरे अधिक आढळत आहेत.

जिल्ह्यात अक्कलकोट तालुक्यात ४५, बार्शी तालुक्यात ४७, करमाळा तालुक्यात १२, माढा तालुक्यात ५५, माळशिरस तालुक्यात २७, मंगळवेढा तालुक्यात २२७, मोहोळमध्ये १०६, उत्तर सोलापुरात आठ, पंढरपुरात ६३ आणि सांगोल्यात १०१, दक्षिण सोलापुरात ४९ अशी एकूण ७४० जनावरे बाधित आहेत. नव्याने आढळलेली ४३ जनावरे पंढरपूर, मोहोळ, सांगोला, माळशिरस तालुक्यांतील आहेत.

आतापर्यंत जिल्ह्यातील ४० हजार ४४३ जनावरांना लम्पी स्कीनची लागण झाली होती. त्यापैकी ३५ हजार ९१७ जनावरे उपचारानंतर बरी झाली आहेत. तर लम्पी स्कीनमुळे ३ हजार ७८६ जनावरांचा मृत्यू झाला आहे.

सध्या मंगळवेढ्यात वाढत असलेल्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून उपाययोजना राबवल्या जात आहेत. त्यासाठी स्वतंत्र नियोजन केल्याचेही सांगण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sunflower Farming: वाणगावात सूर्यफुलाची शेती बहरली

Hapus Mango Fraud: हापूसच्या नावाने फसवणूक

Wheat Market: गव्हाची वाढली आवक, पण ज्वारीने खाल्ला भाव

Floriculture Project: विद्यापीठामध्ये आठ एकरवर फुलपिके संशोधन, व्यावसायिक फुलशेती प्रकल्प

Women Empowerment: औसा तालुक्यातील चाळीस गावात महिला अस्मिता भवन

SCROLL FOR NEXT