Nitrate poisoning in cattle  Agrowon
काळजी पशुधनाची

Animal Poisoning : चिंदरमध्ये विषबाधेने ४१ जनावरांचा मृत्यू

Animal care : जिल्ह्यातील चिंदर (ता. मालवण) येथे तीन दिवसांत ३१ शेतकऱ्यांच्या तब्बल ४१ जनावरांचा मृत्यू झाला आहे. ऐन खरीप हंगाम सुरू असताना हा प्रकार झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

Team Agrowon

Sindhudurg News : जिल्ह्यातील चिंदर (ता. मालवण) येथे तीन दिवसांत ३१ शेतकऱ्यांच्या तब्बल ४१ जनावरांचा मृत्यू झाला आहे. ऐन खरीप हंगाम सुरू असताना हा प्रकार झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. दरम्यान चाऱ्यातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज पशुसंवर्धन विभागाने व्यक्त केला आहे.

जिल्ह्यातील चिंदर येथील जनावरांना तीन दिवसांपूर्वी अचानक त्रास जाणवू लागला. त्यानंतर एक एक जनावराचा मृत्यू होऊ लागला. एका पाठोपाठ एक अशी जनावरे मृत होऊ लागली. तीन दिवसांत आतापर्यंत ३१ शेतकऱ्यांची तब्बल ४१ जनावरांचा मृत्यू झाला आहे.

ऐन खरीप हंगाम सुरू असताना हे संकट ओढवल्यामुळे शेतकरी बिथरले आहेत. नेमके कशामुळे जनावरे मरत आहेत हे कारण शेतकऱ्यांना समजत नव्हते. या प्रकाराची कल्पना पशुसंवर्धन विभागाला दिल्यानंतर पशुसवर्धंन सहआयुक्त डॉ. प्रशांत कांबळे, जिल्हा उपायुक्त डॉ. अतुल डांगोरे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विद्यानंद देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पशुसंवर्धनचे अधिकारी गावात कार्यरत आहेत.

शवविच्छेदन अहवाल तपासणीकरिता पाठविण्यात आला आहे. परंतु चाऱ्यातून सायनाईड विषबाधा झाल्यामुळेच जनावरांचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज डॉ. कांबळे यांनी व्यक्त केला. परंतु तरीही पुणे प्रयोगशाळेचे पथक येऊन आवश्यक रक्त नमुने, चारा नमुने घेणार आहेत. त्या तपासणीनंतरच मृत्यूचे निश्चित कारण समजू शकणार असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Notification: दुष्काळाची अधिसूचना आज: मुख्यमंत्री फडणवीस

Land Acquisition Compensation: आधी मोबदला द्या, मगच मोजणी करा

Red Chilli Market: नंदुरबारात ओल्या लाल मिरचीची आवक सुरू

Drought Assessment Issue: रस्त्याकाठच्या पाहणीने दुष्काळ कसा कळणार?

Maharashtra Drought Condition: राज्यातील तब्बल २५५ तालुक्यांत दुष्काळ

SCROLL FOR NEXT