Lumpy Skin Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Skin : ‘लम्पी स्कीन’मुळे आतापर्यंत ३ हजार ९२ पशुधनाचा मृत्यू

राज्यात ‘लम्पी स्कीन’चा प्रादुर्भाव आणि लक्षणे जाणवू लागल्यानंतर तातडीने लसीकरणाला सुरुवात केल्याने पशुधनाचा बाधित होण्याचे आणि मृत होण्याचे प्रमाण रोखण्यास मदत झाल्याचे सच्चिंद्रप्रसाद यांनी सांगितले.

टीम ॲग्रोवन

पुणे ः ‘लम्पी स्कीन’ आजाराची (Lumpy Skin Infection) लागण झाल्यामुळे राज्यात रविवार (ता. ९) अखेर ३ हजार ९२ पशुधनाचा मृत्यू (Livestock Death) झाला आहे. तर ३२ जिल्ह्यांतील २ हजार ३६८ गावांमधील ७४ हजार ३२९ पशुधन बाधित असून, त्यापैकी ४१ हजार ६१४ पशुधन बरे झाली आहेत. तर सुमारे ८६ टक्के पशुधनाचे लसीकरण पूर्ण झाले असल्याची माहिती पशुसंवर्धन आयुक्त सच्चिंद्रप्रसाद सिंह (Sachhindra Pratap Singh) यांनी दिली.

राज्यात ‘लम्पी स्कीन’चा प्रादुर्भाव आणि लक्षणे जाणवू लागल्यानंतर तातडीने लसीकरणाला सुरुवात केल्याने पशुधनाचा बाधित होण्याचे आणि मृत होण्याचे प्रमाण रोखण्यास मदत झाल्याचे सच्चिंद्रप्रसाद यांनी सांगितले. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये रविवार (ता. ९) अखेर १ कोटी २८ लाख लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामधील १ कोटी २० लाख ३९ हजार लाख पशुधनास मोफत लसीकरण करण्यात आले आहे.

तसेच अकोला, जळगाव, कोल्हापूर, सांगली, वाशीम आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यांमधील लसीकरण पूर्ण झाले आहे. खासगी संस्था, सहकारी दूध संघ आणि वैयक्तिक पशुपालकांनी करून घेतलेले लसीकरण यांच्या आकडेवारीनुसार राज्यात सुमारे ८६ टक्के गोवंशीय पशुधनाचे लसीकरण झाले आहे.

देशात ८५ हजार पशुधनाचा मृत्यू

देशात (१९ ऑक्टोबर) अखेर ८५,६२८ पशुधनाचा मृत्यू झाला आहे. यामध्ये प्रामुख्याने राजस्थानमध्ये ५५ हजार ४४८, पंजाबमध्ये १७ हजार ६५५, गुजरातमध्ये ५ हजार ८५७, हिमाचल प्रदेशमध्ये ४ हजार ३४७ व हरियानामध्ये २ हजार ३२१ पशुधनाचा समावेश आहे. तर महाराष्ट्रात रविवार (ता. ९) अखेर ३ हजार ९२ पशुधनाचा मृत्यू झाला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT