Lumpy Skin Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Skin : जिल्ह्यात ‘लम्पी’मुळे २७ जनावरांचा मृत्यू

जिल्ह्यातील ४८१ जनावरांना लम्पी स्कीन आजाराची बाधा झाली आहे. तर आज पर्यंत २७ जनावरे लम्पी स्कीन आजारामुळे मृत्यूमुखी पडली आहेत.

टीम ॲग्रोवन

नांदेड : जिल्ह्यातील ४८१ जनावरांना लम्पी स्कीन आजाराची (Lumpy Skin Disease) बाधा झाली आहे. तर आज पर्यंत २७ जनावरे लम्पी स्कीन आजारामुळे मृत्यूमुखी पडली आहेत. लम्पी स्कीनच्या नियंत्रणासाठी तीन लाख ९६ हजार ५५० जनावरांचे लसीकरण (Lumpy Vaccination) पूर्ण झाले आहे.

तर नऊ पशुपालकांना शासनाच्या निकषानुसार अर्थसाहाय्य देण्यात आल्याची, माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. मधुसूदन रत्नपारखी यांनी दिली. आजच्या घडीला नांदेड जिल्ह्यातील ६८ गावे बाधित आहेत. या ६८ गावातील ३१ हजार ७५५ जनावरांपैकी ४८१ बाधित पशुधनाला वेगळे काढून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत.

बाधित गावाच्या पाच किलोमीटर परिघातील गावांची संख्या ३८१ आहे. सध्या बाधित गावांची संख्या ४४९ झाली आहेत. या बाधित ६८ गावांच्या पाच किलोमीटर परिघातील ४४९ गावातील (बाधित ६८ गावांसह) एक लाख २३ हजार ५७६ जनावरांची संख्या आहे.

लम्पीमुळे आजपर्यंत २७ जनावरांचा मृत्यू झाला आहे. पशुपालकांनी घाबरून न जाता पशूची स्वच्छता, गोठ्यातील स्वच्छता व पशुवैद्यकीय अधिकारी यांनी सांगितल्याप्रमाणे काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT