Lumpy Skin Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Skin : सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘लम्पी’मुळे आतापर्यंत २३५ जनावरांचा मृत्यू

Lumpy Skin Latest Update : सध्या २९६ जनावरे लम्पीबाधित आहेत. त्यामुळे आतापर्यंत लम्पीबाधित झालेल्या जनावरांची संख्या २ हजार १६३ वर पोहोचली आहे.

Team Agrowon

Sindhudurg News : जिल्ह्यात लसीकरणानंतर देखील लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. आतापर्यंत २३५ जनावरांचा मृत्यू झाला असून, यामध्ये १ एप्रिलनंतरच्या ११२ जनावरांचा समावेश आहे. सध्या २९६ जनावरे लम्पीबाधित आहेत. त्यामुळे आतापर्यंत लम्पीबाधित झालेल्या जनावरांची संख्या २ हजार १६३ वर पोहोचली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत नाही. दिवसागणिक लम्पीबाधित जनावरांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत २ हजार १६३ जनावरांना लम्पी स्कीनचा लागण झाली असून, त्यापैकी १ हजार ७५५ जनावरे उपचारांती बरी झाली आहेत. ३१ मार्चअखेर १२३ जनावरांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर एप्रिल आणि मे महिन्यात लम्पी आटोक्यात होता. परंतु त्यानंतर पुन्हा लम्पीने डोके वर काढले.

जिल्ह्यातील कुडाळ, सावंतवाडी, वेंगुर्ला या भागांत लम्पीबाधित जनावरांची संख्या वाढू लागली. जून, जुलै, ऑगस्टमध्ये लम्पीबाधित जनावरांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली. पशुसंवर्धन विभागाने जुलैपासून पुन्हा लसीकरण मोहीम हाती घेतली.

ऑगस्ट अखेरपर्यंत १०० टक्के लसीकरण करण्यात आले. एकीकडे ५० टक्के अधिकारी कर्मचारी असताना विविध पातळ्यांवर काम करीत लसीकरण पूर्ण करण्यात पशुसंवर्धन विभागाला यश आले आहे. एप्रिलनंतर २२ सप्टेंबरपर्यंत ११२ जनावरांचा लम्पी स्कीनने मृत्यू झाला आहे.

लम्पी स्थिती...

जिल्ह्यात आतापर्यंत २३५ जनावरांचा लम्पीने मृत्यू

जिल्ह्यात सध्या २९६ जनावरे लम्पी स्कीनने बाधित

वेंगुर्ला, सावंतवाडी, देवगड, कुडाळ तालुक्यांत अधिक प्रादुर्भाव

१०० टक्के लसीकरण पूर्ण

१ एप्रिलनंतर ११२ जनावरांचा लम्पीने मृत्यू झाला आहे. त्यापैकी ८० जनावरांच्या नुकसान भरपाई प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. उर्वरित मृत जनावरांच्या नुकसान भरपाईचे प्रस्ताव आता पाठविण्यात येणार आहेत.
- एस. एम. अंबी, पशुवैद्यकीय अधिकारी, चिकित्सालय, कणकवली

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला पूरस्थितीचा आढावा; अतिरिक्त १ हजार ६०० कोटींची मदत जाहीर

Agriculture Technology: धान्य साठवणुकीतून नफ्याचे गवसले तंत्र

Cotton Import Duty: कापूस उत्पादकांच्या अस्तित्वावर घाला

Dragon Fruit Benefits: क्षेत्र वाढते, जाणीव-जागृती वाढवा

Women Empowerment: परभणीतील ग्रामीण भागात ३४ हजार एकल महिला

SCROLL FOR NEXT