Milk Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy : पंजाबमध्ये दूध उत्पादनात १५-२० टक्क्यांनी घट

जनावरांमध्ये लम्पी त्वचा आजाराच्या प्रादुर्भावाचा परिणाम

टीम ॲग्रोवन

चंदीगड (वृत्तसंस्था) ः पंजाब राज्याच्या राज्याच्या पशुसंवर्धन विभागाने (Department Of Animal Husbandry Panjab) दिलेल्या माहितीनुसार, एकूण १.२६ लाख गुरे लम्पी स्कीन (Lumpy Skin Disease) (एलएसडी) या त्वचा आजाराने बाधित झाली असून या संसर्गजन्य आजारामुळे आतापर्यंत १०,००० हून अधिक जनावरे मरण पावली आहेत. जनावरांमध्ये या आजाराचा प्रादुर्भाव वाढत असून परिणामी राज्यातील दुग्ध उत्पादनात (Dairy Production) १५-२० टक्क्यांनी घट झाली असल्याचे प्रोग्रेसिव्ह डेअरी फार्मर्स असोसिएशनने (पीडीएफए) रविवारी (ता. २८) सांगितले.

सांसर्गिक रोगामुळे गुरेढोरे, विशेषत: गाईंच्या आरोग्यावर परिणाम होत असून जनावरांमध्ये मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. जनावरांमधील या आजाराचा फटका ज्यांची उपजीविका संपूर्णपणे पशुधनावर अवलंबून आहे, अशा लहान आणि मध्यम दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना सर्वात जास्त बसला असल्याचे पीडीएफएने म्हटले आहे.

पशुसंवर्धन विभागाने १०,००० हून अधिक जनावरे दगावल्याचे म्हटले असले तरी जुलैपासून राज्यात एलएसडीमुळे एक लाखाहून अधिक गुरे मरण पावल्याचा दावा पीडीएफएने केला आहे. विशेष म्हणजे, एलएसडीचा परिणाम प्रामुख्याने गाईंवर झाला असून फाजिल्का, मुक्तसर, फरीदकोट, भटिंडा आणि तरण तारण हे राज्यातील जिल्हे सर्वात जास्त प्रभावित झाले आहेत. हा रोग माश्या, डासांद्वारे प्राण्यांमध्ये झपाट्याने पसरतो. यामुळे जनावरांच्या संपूर्ण शरीरावर मऊ फोडासारख्या गाठी येतात, ताप, नाक वाहणे, डोळ्यांतून पाणी येणे, लाळ येणे, दुधाचे उत्पन्न कमी होणे आणि भूक न लागणे अशी लक्षणे दिसून येतात.

पंजाबमध्ये सुमारे २२ लाख गायी आहेत. गाई आणि म्हशींचे राज्यातील एकूण दूध उत्पादन रोज सुमारे ३ कोटी लिटर आहे. त्यापैकी १.२५ कोटी लिटर बाजारात विकले जाते, असे पीडीएफएचे अध्यक्ष दलजित सिंग सदरपुरा यांनी सांगितले. ते म्हणाले, की एलएसडीच्या प्रादुर्भावामुळे पंजाबमधील दुधाचे उत्पादन सुमारे १५-२० टक्क्यांनी घसरले असून जनावरांमधील या आजाराचा सर्वाधिक फटका दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे, असे यांनी सांगितले.

एलएसडीमुळे गुरेढोरे आणि जनावरांच्या मृत्यूचे प्रमाण कमी असल्याने गाईंचे सरासरी दूध उत्पादन किमान एक वर्ष कमी राहण्याची अपेक्षा आहे, असे त्यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांनी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची भेट घेऊन एलएसडीमुळे मृत्यूमुखी पडलेल्या जनावरांमागे ५० हजार रुपयांची भरपाई मागितली होती. राज्य सरकारने प्रति जनावर किमान ५० हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी, अशी आमची इच्छा आहे, असे सदरपुरा यांनी सांगितले.

दरम्यान, या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने जनावरांना लसीचे सुमारे ५.९४ लाख डोस दिले आहेत. पुढील आठवड्यात आणखी १० लाख गुरांना लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी (ता. २७) सांगितले, की पंजाबमध्ये एलएसडीचा प्रभाव कमी होऊ लागला आहे. या आजारावर देखरेख आणि नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य सरकारने यापूर्वीच मंत्र्यांचा एक गट तयार केला होता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan Waiver: २६ नोव्हेंबर रोजी संयुक्त किसान मोर्चाचे देशव्यापी आंदोलन; केंद्र सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण करण्याची मागणी

Nitish Kumar Oath Ceremony: बिहारमध्ये पुन्हा 'नितीश'राज, विक्रमी दहाव्यांदा घेतली मुख्यमंत्रीपदी शपथ, PM मोदींची उपस्थिती

Seed Distribution: प्रमाणित बियाणे वितरण बाबींमध्ये तीन जिल्ह्यांकरीता लक्षांक

Sugarcane Farming: पूर्वहंगामी उसातील आंतरपिकांचे नियोजन

Bitter Gourd Farming: कारल्यामध्ये पीक संरक्षण, अन्नद्रव्ये व्यवस्थापनावर भर

SCROLL FOR NEXT