Lumpy Skin  Agrowon
ॲनिमल केअर

Lumpy Skin : लम्पी स्कीन’ प्रादुर्भावामुळे नाशिकमध्ये ६२ जनावरे मृत

जिल्ह्यात सुरुवातीला सिन्नर तालुक्यातील पांगरी व दुसंगवाडी या दोन गावांत लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव आढळून आला होता.

टीम अॅग्रोवन.

नाशिक : जिल्ह्यात सुरुवातीला सिन्नर तालुक्यातील पांगरी व दुसंगवाडी या दोन गावांत लम्पी स्कीन (Lumpy Skin Disease) आजाराचा प्रादुर्भाव आढळून आला होता. त्यानंतर जिल्ह्यातील १३ तालुक्यांतील ७९ गावांमध्ये प्रादुर्भाव झाला.

त्यामध्ये रविवारअखेर (ता. १३) ६२ जनावरे दगावली आहेत. ज्यामध्ये २१ गाई, १९ बैल व १० वासरांचा समावेश आहे, अशी माहिती नाशिक जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विष्णू गर्जे यांनी दिली.

जिल्ह्यात एकूण ८ लाख ९५ हजार ५० जनावरे आहेत. त्यापैकी ८ लाख ९४ हजार ९५९ जनावरांचे म्हणजेच ९९.९९ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. पशुसंवर्धन विभागाने युद्धपातळीवर लसीकरण पूर्ण करून हा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला आहे; मात्र असे असताना आतापर्यंत १ हजार २५२ जनावरे बाधित झाली होती. त्यापैकी ९५३ जनावरे बरी झाली आहेत. तर २३७ जनावरे अद्याप आजारी आहेत. यातील १८ जनावरे अतिगंभीर, ५४ जनावरे गंभीर असून १६५ सौम्य लक्षणांनी बाधित आहेत.

पशुपालकांना १२ लाख ६५ हजारांची मदत

जिल्ह्यातील १३ तालुक्यांतील ७७ गावांमधील १ हजार १८८ लम्पी स्कीनग्रस्त जनावरांपैकी ६२ जनावरे दगावली आहेत. दगावलेल्या पशुधनाच्या पशुपालकास १०० टक्के राज्य शासनाच्या निधीमधून आर्थिक मदत दिली जात आहे. त्यामध्ये दुधाळ गाय ३० हजार, बैल २५ हजार व वासरे १६ हजार याप्रमाणे मदत दिली जात आहे. त्यापोटी १२ लाख ६५ हजार रक्कम अदा करण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fertilizer Scam: विनापरवाना बेकायदेशीर खतनिर्मिती करून विक्री

Kurundkar Banana Chips: कुरुंदकर कंपनीची केळी चिप्स निर्मिती  

Organic Turmeric Farming: सेंद्रिय हळदीची शेती, पावडरीतून मूल्यवर्धन  

Radhakrishna Vikhe Patil: शेतकऱ्यांनी कर्ज काढायच, कर्जबाजारी व्हायच आणि त्यानंतर कर्जमाफी मागायची; राधाकृष्ण विखे पाटलांचे शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त विधान

Farmer Loan Waiver : शेती विरोधी धोरणांमुळे शेतकरी कर्जमाफीची मागणी; विखे पाटलांच्या विधानाचा किसान सभेकडून निषेध

SCROLL FOR NEXT