Lumpy Skin  Agrowon
ॲनिमल केअर

Lumpy Skin : नांदेडमधील ३१२ जनावरांचा‘लम्पी स्कीन’मुळे मृत्यू

नांदेड : जिल्ह्यात लम्पी स्कीन आजाराचा विळखा वाढत आहे. या आजाराने आजपर्यंत ३१२ जनावरांचा मृत्यू झाला आहे.

टीम ॲग्रोवन

नांदेड : जिल्ह्यात लम्पी स्कीन आजाराचा (Lumpy Skin) विळखा वाढत आहे. या आजाराने आजपर्यंत ३१२ जनावरांचा मृत्यू (Animal Death) झाला आहे. जिल्ह्यातील २२२ बाधित गावातील पाच हजार १११ जनावरांना या आजाराची बाधा झाल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयातून मिळाली.

जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून गायवर्ग जनावरांना लम्पी स्कीन आजाराची बाधा झाली आहे. या आजाराचा अटकाव करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असले, तरी या आजाराचा फैलाव सुरूच आहे.

या लम्पी स्कीन आजाराचा अधिक फैलाव होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे व्यापक लसीकरणासह जनावरांच्या स्वच्छतेबाबत जनजागृती केली जात आहे. जिल्ह्यातील एकूण २२२ बाधित गावात पाच हजार १११ गाय वर्ग पशुधनाला लम्पीचा प्रादुर्भाव झाला आहे.

तर या आजारामुळे आतापर्यंत ३१२ पशुधन मृत्युमुखी पडले आहेत. तसेच आजारातून बरे झालेले पशुधनाची संख्या तीन हजार ६१२ आहे. एक हजार १९३ जनावरांवर औषधोपचार चालू आहे.

सद्यःस्थितीत पशुसंवर्धन विभागाकडून लसीकरण मोठ्या प्रमाणात केले जात आहे. आजपर्यंत चार लाख २६ हजार ३१ जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. मृत पशुधनाच्या लाभार्थ्यांची संख्या १४० वर पोहचली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

EL Nino 2026 : तेलंगणामध्ये पावसाची तूट; केंद्र सरकारकडे २० हजार कोटींच्या मदत पॅकेजची मागणी

Weekly Weather: उघडिपीसह अल्प पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT