Lumpy Skin Disease Agrowon
ॲनिमल केअर

Lumpy Skin Disease : ‘लम्पी स्कीन’मुळे राज्यात २२ जनावरांचा मृत्यू

गेल्या महिन्यापासून राज्यात अनेक ठिकाणी ‘लम्पी स्कीन’ आजाराचा प्रादुर्भाव वाढत आहे. याकडे अनेक शेतकरी दुर्लक्ष करत असून, वेळेवर उपचारांअभावी जनावरांचा मृत्यू होत आहे.

टीम ॲग्रोवन

पुणे : गेल्या महिन्यापासून राज्यात अनेक ठिकाणी ‘लम्पी स्कीन’ आजाराचा प्रादुर्भाव (Lumpy Skin Disease Outbreak) वाढत आहे. याकडे अनेक शेतकरी दुर्लक्ष करत असून, वेळेवर उपचारांअभावी जनावरांचा मृत्यू (Livestock Died Due To Lumpy Skin Disease) होत आहे. आतापर्यंत या आजारामुळे राज्यात २२ जनावरांचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. येत्या काळात याकडे दुर्लक्ष केल्यास यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

राज्यात २०२०-२१ मध्ये राज्यातील २६ जिल्ह्यांमध्ये, तसेच २०२१-२२ मध्ये १० जिल्ह्यांत ‘लम्पी स्कीन’चा प्रादुर्भाव आढळून आलेला होता. चालू वर्षी राज्यात गेल्या महिन्यात ४ ऑगस्ट रोजी जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील चिनावल या गावामध्ये जनावरांना या आजाराचा प्रादुर्भाव झाल्याचे निदर्शनास आले.

त्यानंतर राज्यातील जळगाव, नगर, धुळे, अकोला, पुणे, लातूर, औरंगाबाद, बीड, सातारा, बुलडाणा, अमरावती, उस्मानाबाद, कोल्हापूर व सांगली या १४ जिल्ह्यांमध्ये ६ सप्टेंबरअखेर एकूण १४५ गावांमध्ये ‘लम्पी’चा प्रादुर्भाव दिसून आला आहे. बाधित क्षेत्राच्या ५ किलोमीटर परिघातील ६६४ गावांतील एकूण २ लाख ४३ हजार ३२९ पशुधनास लसीकरण करण्यात आले आहे. बाधित गावातील एकूण १३२८ बाधित पशुधनापैकी एकूण ८४८ पशुधन उपचाराने बरे झालेले आहे. उर्वरित बाधित पशुधनावर उपचार सुरू आहेत.

जळगाव जिल्ह्यातील १२, नगर जिल्ह्यातील ३, पुणे जिल्ह्यात ३ बुलडाणा जिल्ह्यात १ व अमरावती जिल्ह्यात ३ असे एकूण २२ बाधित जनावरांमध्ये मरतुक झाली आहे. सध्या राज्यासह भारतातील राजस्थान, गुजरात, पंजाब, हरियाना, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू- काश्मीर, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश व दिल्ली या राज्यांत पशुधनामध्ये ‘लम्पी’चा प्रादुर्भाव आढळून आलेला आहे. पशुसंवर्धन आयुक्त सच्चिंद्रप्रताप सिंह यांनी ‘लम्पी स्कीन’ आजाराने बाधित जळगाव, नगर, अकोला, पुणे, औरंगाबाद, बीड व अमरावती जिल्ह्यांमध्ये प्रत्यक्ष भेटी दिल्या असून उपचार, आजार नियंत्रणासाठी उपाययोजनांचा आढावा घेतला जात आहे.

‘प्राण्यांमधील संक्रमक व सांसर्गिक रोगास प्रतिबंधक व नियंत्रण अधिनियम, २००९’नुसार संसर्ग केंद्रापासून ५ किलोमीटर क्षेत्र नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित करता येते. जिल्हाधिकारी यांना या अधिनियमाखालील अधिकार वापरण्यासाठी व कर्तव्य पार पाडण्यासाठी अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत. त्यानुसार संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी नियंत्रित क्षेत्र घोषित केले असून, सदरील क्षेत्रात आजार प्रतिबंधक लसीकरण करण्यात येत आहे.
सच्चिंद्र प्रताप सिंह, आयुक्त, पशुसंवर्धन आयुक्तालय, पुणे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Rate : सोलापूरमध्ये कांदा टर्मिनल उभारा; कांदा धोरण समितीची राज्य सरकारला शिफारस

Sugarcane Rat: ‘सहकार शिरोमणी’ देणार जिल्ह्यात सर्वाधिक ऊसदर

Konkan Produce: कोकणच्या शेतीमालाचा वसईकरांना गोडवा

Maharashtra Politics: भाजपच्या 'ऑपरेशन लोटस'वरुन शिवसेनेत प्रचंड नाराजी, एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना, काय निर्णय घेणार?

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये सुधारणा; उडीद दबावातच, कांदा दर स्थिर, काकडीला किंमतीत वाढ तर हरभऱ्याला दर कमीच

SCROLL FOR NEXT