हिंगोली ः हिंगोली जिल्ह्यातील पाच तालुक्यातील ९२ गावात बुधवार (ता. ७) पर्यंत २ हजार ६०० जनावरांना लम्पी स्कीन (Lumpy Skin) आजाराचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आले आहे. उपचारानंतर ७८४ जनावरे बरी झाली परंतु १३७ जनावरांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सध्या या आजाराची १ हजार ६७९ जनावरे सक्रिय रुग्ण आहेत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यापैकी ६६ जनावरे गंभीर आजारी आहेत, अशी माहिती पशुसंवर्धन विभागाच्या सूत्रांनी दिली.
जिल्ह्यात लम्पी स्कीन आजाराचा संसर्ग वाढत आहे. जिल्ह्यातील गोवंश पशुधनाची संख्या २ लाख ३२ हजार २०३ आहे. आजवर सर्व पाच तालुक्यातील ९२ गावे बाधित क्षेत्र (ईपी सेंटर) जाहीर करण्यात आली आहेत. या गावातील जनावरांची संख्या १ लाख १४ हजार ७९७ आहे.
आजवर एकूण २ लाख ४१ हजार ८०० लसींचा पुरवठा करण्यात आला. बाधित क्षेत्रातील २ लाख २२ हजार १५७ जनावरे, स्वच्छ क्षेत्रातील १६ हजार ४९६ जनावरे आणि खासगी लसीकरण केलेली ९ हजार ८०० जनावरे मिळून एकूण २ लाख ३८ हजार ६५३ जनावरांचे (१०२.७८ टक्के) लसीकरण करण्यात आले. जिल्ह्यातील सर्व ५ गोशाळांतील जनावरांचे लसीकरण करण्यात आले.
लम्पी स्कीन मुळे दगावलेल्या जनावरांची संख्या
तालुका गाय बैल वासरे एकूण
हिंगोली ५ ६ १४ २५
कळमनुरी ५ ४ १० १९
वसमत ९ ५ २६ ४०
औंढा नागनाथ ५ ११ १५ ३१
सेनगाव ४ ८ १० २२
एकूण २८ ३४ ७५ १३७
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.