Potato Cultivation
Potato Cultivation  Agrowon
ॲग्रो गाईड

Potato Cultivation : बटाटा लागवड करताना काय काळजी घ्याल?

Team Agrowon

बटाटा (Potato) हे अतिशय कमी कालावधीत तयार होणारे पीक आहे. इतर पिकांच्या तुलनेत या पिकापासून सर्वात जास्त उत्पादन मिळते. यामध्ये असणारी प्रथिने, कार्बोदके, पिष्टमय पदार्थ आणि क जीवनसत्त्वे यामुळे आहारात देखील याचे महत्त्वाचे स्थान आहे. बटाट्याची लागवड (Potato Cultivation) राज्यात मुख्यतः रब्बी हंगामात (Rabi Season) केली जाते. परंतु पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव तालुका, सातारा जिल्ह्यातील खटाव, कोरेगाव तालुका आणि नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात लागवड खरीप हंगामात ही करतात. बटाटा लागवड करताना काय काळजी घ्यावी याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने पुढील माहिती दिली आहे. 

बटाट्याची लागवड सरी वरंबा, सपाट वाफे आणि सुधारित सरी वरंबा पद्धतीने केली जाते. याशिवाय रुंद गादीवाफा पद्धत आणि यंत्राद्वारे ही बटाटा पिकाची लागवड केली जाते. 

कुफरी ज्योती, कुफरी लवकर, कुफरी सिंधुरी, कुफरी सूर्या या बटाटा पिकाच्या सुधारित जाती आहेत. महाराष्ट्रातील मैदानी विभागाकरिता रब्बी बटाटा पिकाच्या अधिक उत्पादनाकरिता कुफरी सूर्या या वाणाची शिफारस करण्यात आली आहे. चिपसोना १,२ आणि ३ या जाती चिप्स बनविण्यासाठी उपयुक्त आहेत. 

हेक्टरी १६ ते १८ क्विंटल बेणे लागते. बेण्यावर १ सेंमी आकाराचे जाड अंकूर असावेत. बेणे निरोगी उत्तम दर्जाचे आणि करपा मर रोगापासून मुक्त असावेत. 

रब्बी हंगामात ऑक्टोबर - नोव्हेंबर महिन्यात बटाट्याची लागवड कऱावी. सरी वरंबा पद्धतीने लागवड करण्यासाठी ६० बाय २० सेंटीमीटर अंतरावर लागवड करावी.  लागवडीसाठी हेक्टरी १५ ते २० क्विंटल बियाणे लागते. 

लागवडीपूर्वी २.५ किलो अॅझोटोबॅक्टर आणि ५०० मिली द्रवरुप अॅसिटोबॅक्टर प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून २० क्विंटल बियाण्यावर ३० मिनिटे बेणे प्रक्रिया करावी.  

लागवडीपूर्वी १०० किलो नत्र, ६० किलो स्फुरद आणि १२० किलो पालाश प्रति हेक्टरी द्यावे. लागवडीनंतर एक महिन्याने हेक्टरी ५० किलो नत्राची मात्रा द्यावी व मातीची भर द्यावी. लागवडीच्यावेळी २० किलो झिंक सल्फेट प्रति हेक्टरी शेणखतात मिसळून द्यावे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing : सांगली जिल्ह्यात अडीच लाख हेक्टरवर होणार खरिपाचा पेरा

Jal Jivan Mission : निधी खर्च केला, पण गावांत पाणीच नाही

Maharudra Mangnale : कडूनिंबांशी दोस्ती ! : महारुद्र

Illegal Cotton Seed : ३१ लाखांचे अवैध एचटीबीटी कापूस बियाणे जप्त

Food Safety India : एफएसएसएआयचा 'कॅल्शियम कार्बाइड'च्या वापराबाबत इशारा; वापर टाळण्याच्या केल्या सूचना

SCROLL FOR NEXT