Turmeric Processing Agrowon
ॲग्रो गाईड

Turmeric Processing : हळद प्रक्रियेतून कोणकोणते पदार्थ तयार होतात?

Turmeric Products : हळद पावडरीला भारतीय पदार्थात अनन्यसाधारण महत्व आहे. हळदीपासून कुरकुमीन, ओलिओरेझीन, तेल निर्मिती केली जाते याशिवाय आयुर्वेदीक आौषधांमध्येही हळदीचा वापर होतो.

Team Agrowon

Turmeric : जगातील सर्वाधिक हळद उत्पादन (Turmeric Production) भारतात होते. महाराष्ट्रात हळद लागवड प्रामुख्याने सातारा, सांगली, कोल्हापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, चंद्रपूर आणि नागपूर जिल्हात होते.

हळद पावडरीला (Turmeric Powder) भारतीय पदार्थात अनन्यसाधारण महत्व आहे. हळदीपासून कुरकुमीन, ओलिओरेझीन, तेल निर्मिती केली जाते याशिवाय आयुर्वेदीक आौषधांमध्येही हळदीचा वापर होतो.

हळदी पासून विविध मूल्यवर्धित पदार्थ

१) कुरकुमीन: हळदी मधील महत्वाचे पोषकतत्व असलेले कुरकुमीन घटकाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कुरकुमीन हे एक औषधी पोषकतत्व आहे आणि त्याची वैशिष्ट्ये आपल्या आरोग्यासाठी महत्वाची आहे.

अल्कोहोल वापरून हळद कंदातील कुरकुमीन नावाचा घटक वेगळा केला जातो. हळदीच्या वाणानुसार कुरकुमीनचे प्रमाण वेगवेगळे असते. कुरकुमीन हे साधारणतः २ -६ टक्के या प्रमाणात आढळते.

२) ओलिओरेझीन: म्हैसूर येथील केंद्रीय अन्न तंत्रज्ञान संशोधन संस्थेने हळदी पासून ओलिओरेझीन काढण्याची सुधारित पद्धती विकसित केली आहे.

रंग व स्वादाकरिता ओलिओरेझीनचा उपयोग औषधे व खाद्य पदार्थामध्ये करतात.

ओलिओरेझीन चे शेकडा प्रमाण ५ ते ७ टक्के असून त्यातील व्होलाटाईल तेलाचे प्रमाण १८ ते २० टक्के असते.

३) हळद पावडर: हळदी पासून पावडर तयार करण्यासाठी वेग वेगळ्या जातीच्या हळकुंडाचा वापर केला जातो. हळद पावडर तयार करण्यासाठी हळकुंडे ग्राइंडिंग मशीनमधे भरडली जातात.

ही हळद पावडर वेगवेगळया मेशच्या जाळीतून बाहेर पडून शेवटी ३०० मेश जाळीमधून बाहेर पडते.

तयार पावडर ५,१०,२५ किलो आकाराच्या प्लॅस्टिक किंवा कापडी पिशवीमध्ये पॅकिंग करून विक्रीसाठी पाठविली जाते.

४) तेल निर्मिती: हळदीच्या ताज्या कंदापासून तेल निर्मिती करता येते. हळीच्या कंदापासून जवळपास ५ - ६ टक्के तेल मिळते.

हळदीपासून मिळणारे तेल हे नारंगी पिवळसर रंगाचे असते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Garlic Rate : लसणाची आवक घटल्याने दर तेजीतच

Forest Fire : वणवे नियंत्रणासाठी जनजागृती करण्याची गरज

Sugarcane Labor Migration : निवडणूक संपताच ऊसतोड मजुरांचे स्थलांतर

Sugarcane FRP : मंडलिक साखर कारखाना इतरांच्या बरोबरीने दर देणार

Milk Rate : देशातील दूध उत्पादनात ४ टक्के वाढ; केंद्रीय मंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT